प्रखर दाहकतेचा सामना करीत अकलूज पोलिस कर्तव्यदक्ष
अकलूज ( विलास गायकवाड ) - जगभरात कोरोनाने कहर केला असून कोरोना सारख्या महाभयंकर संकटावर मात करण्यासाठी शासन, प्रशासन, अहोरात्र झटत झगडत आहेत. अशातच जीवाची बाजी लावत तर सूर्याच्या प्रखर दाहकतेचा सामना करीत अकलूज पोलीस कठोर परिश्रम घेताना दिसत आहेत.
महाभयानक आशा प्राणघातक कोरोना सारख्या क्रूर विषाणूने जगाच्या पाठीवर थैमान घातले आहे. कित्येकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे.आपल्या देशातही राक्षसरूपी कोरोनाचा शिरकाव पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असले तरी आपले शासन, प्रशासन, आरोग्य सेवा, डॉक्टर यंत्रणा, पोलिस यंत्रणा, स्वतःचा जीव धोक्यात घालून खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभे राहत सर्वप्रकारे मदतीचा हात देत आहेत! तर काळजी घ्या, मीच माझा रक्षक म्हणून सतर्क राहा, घराबाहेर पडू नका, मास्क वापरा, सतत हात स्वच्छ धूत रहा, एकमेकांच्या संपर्कात येऊ नका, जीवनाश्यक वस्तू खरेदी करताना जास्तीत जास्त अंतर ठेवा हे सतत आपल्यासाठी, आपल्या काळजीपोटी सांगत आहेत.
सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याशी बांधील राहत, अकलूज पोलिस कधी रणरणत्या उन्हाच्या वनव्यात तर कधी काळोखाच्या अंधाऱ्या रात्री आपल्यावर सोपवलेल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असून बिट वाईस, सेक्टर वाईस रात्रगस्त ही तेवढ्याच जबाबदारीने पार पाडत आहेत. माणसा माणसांचे जीवन उद्ध्वस्त करणार्या अदृष्य अशा कोरोना रुपी गुन्हेगाराचा शिरकाव अकलूज हद्दीत होऊ नये म्हणून माझ्यावर असलेल्या जबाबदारीशी प्रामाणिकपणे राहत रणरणत्या उन्हात तर कधी काळोखाच्या रात्री पुणे जिल्हा व सोलापूर जिल्हा( सराटी-अकलूज) च्या सीमेवर अत्यंत बारकाईने खबरदारी घेत आहेत. तर अकलूजच्या प्रत्येक चौकात तेवढ्याच जबाबदारीने कर्तव्य करीत आहेत .अकलुज पोलिस करीत असलेल्या कर्तव्याचे आता सर्व अकलूजकरातून कौतुक होताना दिसत आहे.

No comments:
Post a Comment