कोरोना वरील उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 7 लाख - आ.बबनदादा शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 27, 2020

कोरोना वरील उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 7 लाख - आ.बबनदादा शिंदे

कोरोना वरील उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 7 लाख - आ.बबनदादा शिंदे



संपूर्ण देशात व राज्यामध्ये कोरोना विषाणुच्या संसर्गजन्य विकाराची आपत्ती निर्माण झालेली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रशासन व राज्यशासन निरनिराळे उपाययोजना राबवित असून या उपाययोजनांसाठी हातभार म्हणून विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे कामगारांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.
         संपूर्ण देशात व राज्यात कोरोना विषाणुचा संसर्ग झालेला असून त्याची तीव्रता दिवसेनदिवस वाढत आहे. कोरोना विकाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्यशासन स्तरावर निरनिराळे उपाययोजना राबविणेत येत आहेत. कोरोना विषाणूची बाधा होवू नये यासाठी केंद्र व राज्यशासन प्रतिबंधात्मक उपाय सुचवून कसोशीने नागरिकांना मार्गदर्शन करीत आहे. तसेच कोरोनाग्रस्त रूग्णांना उपचाराची जरूर ती सुविधा पुरवित आहे. कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्यशासन यांना संचारबंदी सारखी कठोर पावले उचलावी लागली आहेत. त्यामुळे लोकांचा रोजगार बुडाला असून शेती, व्यवसाय व उद्योगधंद्यावर त्याचा परिणाम होवून मोठे संकट निर्माण झालेले आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने नेहमी अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मदतीचा हात पुढे केलेला आहे. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीमध्ये सामाजिक जबाबदारी म्हणून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कामगारांचा एक दिवसाचा पगार रू.7.00 लाख मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणेत येणार असल्याची माहीती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.
          कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र व राज्यशासन यांचे आवाहनास प्रतिसाद देवून कोणीही घराबाहेर पडू नये, त्यामुळे कोरोना विकारापासून बचाव करणे शक्य होणार आहे. सर्वांनी आपले व आपल्या कुंटूंबियांचे आरोग्य सुरक्षित राहणेसाठी प्रयत्नशील राहावे.  याचाच एक भाग म्हणून कोरोना विषाणूची बाधा होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कार्यालयीन कामकाज दि.22 मार्च,2020 ते 31 मार्च,2020 या कालावधीमध्ये बंद ठेवण्यात आलेले आहे. तसेच केंद्रशासन व राज्यशासन यांनी देशात 21 दिवसासाठी केलेल्या लॉकडाऊन नुसार 14 एप्रिल,2020 पर्यंत कार्यालयीन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे अशी माहीती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.सदरप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.एस.रणवरे, जनरल मॅनेजर एस.आर.यादव, वर्क्स मॅनेजर सी.एस.भोगाडे, चिफ केमिस्ट पी.एस.येलपले, फायनान्स मॅनेजर डी.डी.लव्हटे, मुख्य शेतकी अधिकारी एस.पी.थिटे, मुख्य ऊस विकास अधिकारी एम.आर.भादुले, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही.बागल, शेतकी अधिकारी एस.एस.बंडगर व कामगार युनियन अध्यक्ष अनिल वीर व जनरल सेक्रेटरी जगदीश देवडकर हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages