राष्ट्रवादीचा विजयी टीमचा मुंबईत सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 1, 2026

राष्ट्रवादीचा विजयी टीमचा मुंबईत सत्कार

 राष्ट्रवादीचा विजयी टीमचा मुंबईत सत्कार 





अकलूज (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने अकलूज नगरपरिषदेत मिळवलेल्या एकहाती व निर्विवाद विजयाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विजयी पदाधिकाऱ्यांचा भव्य आणि उत्साहपूर्ण सत्कार सोहळा पार पडला. पक्षाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते नगराध्यक्ष रेश्माताई अडगळे, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील आणि सर्व विजयी नगरसेवकांचा गौरव करण्यात आला.

अकलूज नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करत स्थानिक राजकारणात आपली मजबूत पकड पुन्हा अधोरेखित केली आहे. या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली असून, राज्यभरात या निकालाची दखल घेतली जात आहे.

सत्कार सोहळ्यात क्रांतिसिंह माने पाटील, सचिन देशमुख, विशाल मोरे, नासिक आबा सोनवणे, मोहसीन शेख, विलास क्षीरसागर, अझर शेख, मिलिंद कोतमिरे, युवराज दोरकर, वैशाली भोसले, मनीषा तिकोटे, प्रियांका गायकवाड, मंदाकिनी पाडोळे, मृदुला सूर्यवंशी, प्रतिभा गायकवाड, शितल बनपट्टे, रेश्मा तांबोळी या नगरसेवकांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या कामगिरीचे कौतुक करत पक्ष नेतृत्वाने भविष्यातही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, “अकलूजमधील हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून, तो जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा परिणाम आहे. विकासाभिमुख कामातून हा विश्वास अधिक दृढ करा,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
नगराध्यक्ष रेश्माताई अडगळे आणि उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी या सन्मानाबद्दल आभार व्यक्त करत, अकलूजच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमाला लालासाहेब अडगळे, महेश सूर्यवंशी, धनाजी भोसले, संजय पाडुळे, लखन गायकवाड, मोहन तिकोटे, विलास गायकवाड, रवी लव्हाळे, सुनील पवार, गणेश वसेकर, परशुराम बनपट्टे, पुष्कराज दिवाडकर, इकबाल तांबोळी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages