१५१ बेवारस वाहने मालकाच्या प्रतीक्षेत
अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी, बेवारस वाहनांची निर्गती करणे करीता, विशेष मोहिम राबवुन जास्तीत जास्त, बेवारस वाहनांची निर्गती करणे बाबत आदेशित केले आहे.
अकलुज पोलीस स्टेशन आवारामध्ये बेवारस स्थितीत व वेगवेगळया कारवाई दरम्यान मिळुन आलेली १५१ वाहने लावण्यात आलेली आहेत. अकलूज पोलिसांनी सदरच्या वाहनाच्या मालकीबाबत माहिती घेतली असता, माहिती मिळुन आलेली नाही. सदर वाहनांची यादि अकलुज पोलीस स्टेशन येथिल नोटिस बोर्डावर तसेच अकलुज बस स्थानक, माळशिरस, वेळापूर व नातेपुते पोलीस स्टेशन, येथे लावण्यात आलेली आहे. सदरची वाहने ज्यांची आहेत अशा लोकांनी वाहनाबाबतची खात्री करुन कागदपत्रासह अकलूज पोलीस स्टेशन येथे हजर राहुन अर्ज करावा व १५ दिवसाचे आतमध्ये मालकि हक्कबाबत दावा करावा असे आवाहन अकलूज पोलीस ठाण्याचे कर्तव्यनिष्ठ पोलिस निरीक्षक निरज उबाळे यांनी केले आहे.
सदर बाबत काही माहिती हवी असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करण्यात यावा
अकलूज पोलीस स्टेशन:-०२१८५२२२१००,
पोहेकॉ/९१ तानाजी टिंगरे:-७०२०१०५४२७, ८८०५८९९०९१
पोकॉ/४५२ मोहन मरके:-९६८९८५८४२७
.png)
No comments:
Post a Comment