Hot Posts

6/recent/ticker-posts

वासुद (अकोला) येथे केली निर्जंतुकीकरण फवारणी

वासुद (अकोला) येथे केली निर्जंतुकीकरण फवारणी


सांगोला (तालुका प्रतिनिधी): कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गावात होऊ नये यासाठी वासुद (आ) ता.सांगोला इथे संपूर्ण गावात फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली.
         सध्या महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे.
       पंचायत समितीच्या माध्यमातून गावपातळीवर देखील जंतूंनाशकाची फवारणी, मास्क वाटप, सोशल डिस्टन्स यासारख्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील वासुद (अकोला) या गावात भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत, वासुदचे उपसरपंच विठ्ठल केदार याच्या हस्ते संपूर्ण गावात जंतूंनाशकाची फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली.
        यावेळी रणजितसिंह सावंत, संभाजी चव्हाण, सुनील केदार (पिनू), समाधान केदार (SK), पोपट भोरे, ग्रामसेवक संजय खटकाळे, पोलीस पाटील शहाजी पाटील, जावेद मुलाणी आदी उपस्थित होते
Reactions

Post a Comment

0 Comments