Hot Posts

6/recent/ticker-posts

९ जुलै देशव्यापी सार्वत्रिक संप व ठिकठिकाणी आक्रमक आंदोलने

 ९ जुलै देशव्यापी सार्वत्रिक संप व ठिकठिकाणी आक्रमक आंदोलने


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्र सरकार सत्तेत आल्यापासून जनता व कामगार विरोधी धोरणे अमलात आणण्याचा सपाटा चालू ठेवला असून त्यामुळे कामगार कष्टकरी मध्यम वर्गीय आणि कर्मचाऱ्यांचे जीवन अतिशय गुंतागुंतीचे बनले आहे. एकंदर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सध्या देश जात आहे. त्याचबरोबर शहर आणि जिल्ह्यात सध्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कडून खाजगी भांडवलदारा मार्फत जुने उपयुक्त असे डिजिटल मीटर काढून स्मार्ट मीटरची सक्ती चालू आहे. ही शक्ती रद्द करून सर्वसामन्यांना परवडेल अशा सवलतीच्या दरात सौर ऊर्जाची उपलब्धता करून द्यावी या मागणी करिता सीटूच्या पुढाकाराने मा. मुख्यमंत्री यांना पत्र व्यवहार व व्यापक जनआंदोलनाच्या माध्यमातून एक लाख तक्रारी अर्ज दाखल केले. परंतु शासन यावर ठोस निर्णय घ्याला तयार नाही. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. जर स्मार्ट मीटरची सक्ती रद्द न झाल्यास रस्त्यावर मंत्री महोदयांच्या गाड्या रस्त्यावर चालू देणार नाही. असा झळाळीत इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम यांनी दिला.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU) व केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने सध्या केंद्र व राज्य सरकार जनता व कामगार, कर्मचारी विरोधात राबवत असलेल्या धोरणांविरुद्ध ०९ जुलै रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली असून त्या अनुषंगाने जुनी मिल कंपाऊंड - कॉ नरसय्या आडम मास्तर व कॉ. नलिनीताई कलबुर्गी, पूनम गेट - कॉ.एम.एच.शेख., अशोक इंदापूरे कॉ.गोदूताई परुळेकर कुंभारी – कॉ.युसुफ शेख मेजर, विल्यम ससाणे, सोलापूर महानगर पालिका आयुक्त कार्यालय - खाजाभाई करजगी आदींच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे विविध ठिकाणी संघटित व असंघटित कामगार आणि राज्य  सरकारी कर्मचारी हे संपावर जात धरणे आंदोलन केले.  

पूनम गेट येथे सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख यांनी सभेला संबोधित करताना म्हणाले कि, देशातील योजना कर्मचारी व आशा व गटप्रवर्तकांच्या थकीत वेतन व प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्यात सरकार कुचकामी ठरले आहे. जन सुरक्षा विधेयकाच्या नावाखाली डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आणि लोकशाही मार्गाने लढणाऱ्या नागरिकांचे संवैधानिक अधिकार हिरावून घेऊ पाहत आहे. कामगारांनी रक्तरंजित क्रांती करून मिळविलेले कामगार कायदे पायदळी तुडवून चार श्रम संहिता लागू करण्याचा दुर्दैवी घाट घातलेला आहे. अशा केंद्र आणि राज्य सरकारला आव्हान दिल्याशिवाय प्रश्नांची उकल होत नाही.

कुंभारी येथील राष्ट्रीय महामार्गावर कॉ. गोदुताई परुळेकर नगर येथील स्थानिक नागरी समस्या घेऊन रास्तारोको वेळी सभेला सिटूचे राज्य सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर) संबोधित करताना म्हणाले कि, कॉ. गोदुताई नगर हि श्रमिकांची वसाहत असून गेल्या १९ वर्षापासून ड्रेनेज, अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ते यांची दुर्दशा झालेली आहे. विडी कामगारांच्या या वसाहतीत विमा दवाखाना नसल्यामुळे कित्येक विडी कामगार महिलांना योग्यवेळी औषधोपचारा अभावी जीव गमवावा लागला. शहरापासून १५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या खाजगी व शासकीय दवाखान्यात उपचारासाठी येणे अत्यंत जिकीरीचे आहे. म्हणून तातडीने विडी कामगारांसाठी विमा दवाखाना उभारणी गरजेचे आहे.
कॉ. गोदूताई परुळेकर नगर कुंभारी येथे रास्तारोको चे आंदोलन जारी केले होते ते दडपून टाकण्यासाठी स्थानिक पोलिसांनी सिटू चे नेते कॉ.विल्यम ससाणे, कॉ रफीक काझी, कॉ बापू साबळे, कॉ वसीम देशमुख यांना ताब्यात घेऊन वळसंग पोलीस स्टेशन येथे नजर कैदेत ठेवले.
शंतनु गायकवाड, कॉ.नसीमा शेख (विडी युनियन नेत्या), व्यंकटेश कोंगारी, मुरलीधर सुंचु, पुष्पा पाटील (आशा व गट प्रवर्तक युनियन राज्य सरचटणीस), बापू सदाफुले (सो. म. पा), अमृत कोकाटे (राज्य सरकारी), संतोष हुमनाबाद (महाराष्ट्र राज्य प्रा. शि. संघटना), दत्ता भोसले (कॉलेज कर्मचारी युनियन अध्यक्ष, सुहास मार्डीकर (AIBEA), जनार्दन शिंदे (महापालिका), रवी नष्टे (महसूल), बाळी मंडेपु (सफाई मजदुर प्रदेश अध्यक्ष), वसंत खेडकर (MSMRA), जोतीराम शिंदे (पाटबंधारे), दिनेश बनसोडे (जि. प. महासंघ), लक्ष्मण  गळगुंडे (ग्रामसेवक), पाटील (ग्रामपंचायत अधिकारी), हजरत शेख (महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी), राजन सावंत (राज्य उपाध्यक्ष शिक्षक समिती) आदींची उपस्थिती होती.

पूनम गेट येथे कॉ. शेवंता देशमुख, सिद्धाराम उमराणी, म. हनीफ सातखेड, लिंगव्वा सोलापुरे, किशोर मेहता, रमेशबाबू, अरुण सामल, बाबू कोकणे, दीपक निकंबे, किशोर झेंडेकर, ज्योती उराडे, रूपाली दोरकर, मंगल वावरगिरे, सोनिया सोपल, पूजा तडसरे, विना सुरवसे. मल्लेशम कारमपुरी आदींनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments