Hot Posts

6/recent/ticker-posts

खा.मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ओव्हरब्रिज व सबवे कामांना मंजुरी

 खा.मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ओव्हरब्रिज व सबवे कामांना मंजुरी


अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले असून,वैराग-माढा रेल्वे क्रॉसिंग व उंदरगाव-उपळाई येथे ओव्हरब्रिज व सबवे कामांना मंजुरी मिळाली आहे.
                  वैराग-माढा रेल्वे क्रॉसिंगजवळील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व वाहतूक सुलभतेसाठी अंडर/ओव्हर ब्रिजची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ही मागणी लक्षात घेऊन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना आता यश मिळाले असून, रेल्वे प्रशासनाने टिणी एलसी क्र. ४० येथे रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी) साठी अधिकृत मंजुरी दिली आहे.

त्याचबरोबर, माढा तालुक्यातील उंदरगाव-उपळाई (खुर्द) या भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी माढा-वाकाव-अनगर रेल्वे मार्गावरील किमी ३९४/७-८ आणि ४०३/८-९ या ठिकाणी दोन पादचारी सबवे मंजूर करण्यात आले आहेत. या कामांना लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे स्थानिक नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा मार्ग उपलब्ध होणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments