Hot Posts

6/recent/ticker-posts

"कामगार कायदे संपवून, जनसुरक्षा विधेयकाच्या नावाने जनतेचा आवाज घोटणाऱ्या सरकारच्या विरोधात कामगारांचा दणदणीत संप- धनंजय कुलकर्णी

 "कामगार कायदे संपवून, जनसुरक्षा विधेयकाच्या नावाने जनतेचा आवाज घोटणाऱ्या  सरकारच्या विरोधात कामगारांचा दणदणीत संप- धनंजय कुलकर्णी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- "कामगार कायदे संपवून, जनसुरक्षा विधेयकाच्या नावाने जनतेचा आवाज घोटणारे विधेयक आणून सरकार च्या विरोधात बोलले तर अशा जनतेला अर्बन नक्षल ठरवून त्यांना जेलमध्ये टाकणं किंवा एन्काऊंटर स्वरूपाचे नाटक करून अशा जनतेचा अधिकृत खून करणे कायदेशीर व्हावे या नीच भावनेने सध्या सत्ताधारी लोक वाटचाल करीत आहेत. जनतेमध्ये धर्म,जात, भाषा आणि प्रांत यावर फूट पाडून जनाद्रोही धोरणे सरकार उघडपणे राबवित आहे. बँका,विमा,विमानतळे,ऊर्जा यासारखे अतिशय महत्त्वाचे उद्योग अदानी, अंबानी सारख्या काही मोजक्या लोकांच्या मालकीची असावेत व ती त्यांना मातीमोल भावाने विकून कायदेशीर भ्रष्टाचार करावा असे सरकारला वाटते आणि यासाठी विरोध करणाऱ्या कामगार संघटनांना मोडून काढू पाहणाऱ्या चार कामगार कायदे हे श्रम संहिता या गोंडस नावाने हे सरकार आणत आहे. या कायद्यांना विरोध करणाऱ्या कामगारांना जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून अर्बन नक्षल ठरवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्य व केंद्र सरकार करत आहे. म्हणूनच आजचा संप हा श्रमिक, बेरोजगार एकतेचा बुलंद आवाज करण्यासाठी दणदणीत साजरा होतोय, यासाठी आपले अभिनंदन," असे उदगार बँक कर्मचाऱ्यांचे नेते कॉ.धनंजय कुलकर्णी यांनी काढले.
लातूरच्या बँक ऑफ महाराष्ट्र च्या मुख्य रस्त्यावरील शाखेसमोर संपकरी निदर्शकांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले की,‌ "बँका,विमा,विमानतळे,ऊर्जा यासारखे अतिशय महत्त्वाचे उद्योग अदानी, अंबानी सारख्या काही मोजक्या लोकांच्या मालकीची असावेत असे सरकारला वाटते म्हणूनच याला विरोध करणाऱ्या कामगार संघटनांना मोडून काढू पाहणाऱ्या चार श्रम संहिता सरकार आणत आहे. या कायद्यांना विरोध करणाऱ्या कामगारांना जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून अर्बन नक्षल ठरवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्य व केंद्र सरकार करत आहे. त्यामुळेच आजचा हा संप अपरिहार्यपणे देशातील सर्व कामगारांना करावा लागतो आहे.केंद्र सरकार चार श्रम संहिताच्या माध्यमातून कामगार संघटनांच्या हक्कावर गदा आणून कामगारांचा संघटित होण्याचा, संप करण्याचा, सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आवाज उठविण्याचा हक्क नाकारत आहे. म्हणूनच देशभरातील 25 कोटी कामगार त्यांच्या संविधानिक हक्काकरिता नऊ जुलै रोजी संपावरती आहेत."
            जिल्हाभरातील बँकांमधील शंभरहून अधिक कर्मचारी बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य शाखेसमोर निदर्शनासाठी जमले होते. यावेळी संपाची भूमिका स्पष्ट करताना धनंजय कुलकर्णी पुढे म्हणाले की " विमा क्षेत्र असो, बँका असो, महावितरण असो की अन्य सार्वजनिक उपक्रम या सर्व फायद्यातील सार्वजनिक उपक्रमांना सरकार मोठ्या उद्योगपतींच्या हातात सोपवु इच्छिते. एकीकडे आत्मनिर्भर भारत म्हणायचे तर दुसरीकडे लाभांश रूपाने सरकारला पैसा देणाऱ्या फायद्यातील सार्वजनिक उपक्रमांना या मोठ्या उद्योगपतींच्या गळ्यात घालायचे हे धोरण सरकार राबवीत आहे. सरकारच्या या गोष्टीला विरोध करणाऱ्या कामगारांना नवीन कायद्यानुसार सरकार असंघटित करू पाहत आहे. सार्वजनिक उपक्रमांनी सरकारला केवळ लाभांशच दिलेला नाही तर राष्ट्र उभारणीच्या कार्यात सुद्धा सार्वजनिक उपक्रमांनी अमूल्य  योगदान दिलेले आहे हे सरकार सोईस्करपणे विसरत आहे. लाखो तरुणांना नोकऱ्या देऊन त्यांच्या कुटुंबाचा जीवन स्तर उंचाविण्याचे काम या सार्वजनिक उपक्रमांनी केलेले आहे.

     भारत जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातो. या देशातील लाखो तरुणांनी कौशल्यपूर्ण शिक्षण घेतलेले आहे परंतु आज त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळेच बेरोजगारीचा महापूर या देशामध्ये पहावयास मिळतो. आज बँका,एलआयसी यासारख्या क्षेत्रांमध्ये लाखो कायमस्वरूपी नोकऱ्यांची गरज असताना सुद्धा कंत्राटीकरणाचे नवीन प्रारूप हे सरकार घेऊन आलेले आहे. हे प्रारूप म्हणजे केवळ देशातील सुशिक्षित तरुणांच्या भवितव्याशीच केलेला खेळ नसून कंत्राटदारांची घरे भरण्यासाठी सुद्धा रचलेला सुनियोजित सापळा आहे हे देशातील सर्व सुजान नागरिक,कष्टकरी व श्रमिक बांधवांनी लक्षात घ्यावयाची गोष्ट आहे. खाजगीकरण,कंत्राटीकरणाच्या माध्यमातून आपल्या मुलांचे भविष्य अंधकारमय करणाऱ्या या सरकारच्या विरोधात भविष्यकाळात कष्टकऱ्यांची मूठ आणखी आवळली जाईल हे सरकारने ध्यानात घ्यावे व कष्टकऱ्यांच्या,श्रमिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा श्रमिकांच्या एकीमध्ये सत्तापालटाचे सुद्धा बळ आहे हे,हा इतिहास  त्यांनी कदापिही विसरू नये." अशा स्पष्ट शब्दात त्यांनी सरकारी धोरणांचा राक्षसी बरखा फाडला.
 
यावेळी इंटक प्रणित महावितरण कर्मचाऱ्यांचे नेते राजकुमार कत्ते, कॉ. दीपक माने, कॉ. परमेश्वर बडगिरे, कॉ. स्वप्निल जाधव, कॉ. भीमाशंकर उटगे, कॉ. रेश्मा भवरे, कॉ.सुधीर मोरे यासह जिल्हाभरातून 100 हून अधिक कर्मचारी निदर्शने करण्यासाठी मिनी मार्केट येथील लातूर मुख्य शाखेच्या समोर जमले होते.
महत्वाचे म्हणजे सेवानिवृत्त कर्मचारी कॉ.शरद बोर्डे, कॉ.अनंत अघोर यांसारख्या ज्येष्ठ कर्मचाऱ्या चा या निदर्शनातील सहभाग लक्षवेधी ठरला.  

Reactions

Post a Comment

0 Comments