अखिल भारतीय सेनेच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 28, 2020

अखिल भारतीय सेनेच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप

अखिल भारतीय सेनेच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप



प्रतिनिधी:(कालीदास जानराव) संपूर्ण जगाला मृत्यूचा विळखा घातलेल्या कोरोना व्हायरसला पायबंद घालण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे.नागरिक घराबाहेर पडू शकत नाहीत.सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम नाही.त्यामुळे सर्व आर्थिक चक्रे बंद झाली आहेत.गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे.सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अखिल भारतीय सेना माढा तालुका अध्यक्ष गणेश नलवडे यांच्याकडून गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूं जसे की आटा, खाद्यतेल,दाळ, साबण,डेटॉल,सॅनिटायझर इत्यादी वस्तूचे घरपोच वाटप करण्यात येत आहे.हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या गोरगरीब जनतेला यांतून मोठा आधार मिळत आहे.जास्तीत जास्त गरजु लोकांनी याचा लाभ घ्यावा असे अखिल भारतीय सेनेचे माढा विधानसभा अध्यक्ष गणेश नलवडे यांनी केले आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages