अकलूज - जनसेवा संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 28, 2020

अकलूज - जनसेवा संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

 जनसेवा संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन 
डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहीते पाटील यांनी स्वता: रक्तदान करून सुरवात केली

अकलूज ( प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा हाहाकार पाहता राज्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे.सध्या कोरोना सारखा महाभयंकर संसर्गजन्य रोग जगामध्ये फैलावत आहे. कोरोनाचे संसर्गामुळे आणि शाळा महाविद्यालयाला सुट्टी असलेने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.   या पार्श्वभूमीवर जनसेवा संघटनेचे नेते डाॅ.धवलसिंह मोहीते पाटील यांनी जनसेवा संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांना व जनतेला रक्तदान करणेचे आवाहन केलं आहे. या आव्हानास अनुसरून जनसेवा  संघटनेचे १००० कार्यकर्त्यांनी रक्तदान करून  या राष्ट्रीय आपत्ती मध्ये सहभागी व्हायचे ठरवले असुन भारतामध्ये केंद्र व राज्य सरकारने सोमवारी मध्यरात्री पासून १४४ कलम लागू करुन लॉकडाऊन केलेले असलेने तसेच एका ठिकाणी सर्व रक्तदाते जमा झालेवर गर्दिमुळे कोरोना संसर्गाची शक्यता असलेने ब्लड बँकेस जशी गरज पडेल त्याप्रमाणे रक्तदान करणेत येणार आहे. पहिल्या टप्प्यात १००० रक्तदात्यांची यादी सहकार महर्षि शंकरराव मोहीते पाटील ब्लड बँकेकडे दिली आहे. पुढे जशी  गरज पडेल त्याप्रमाणे आणखी रक्तदान करणेत येणार असलेचे जनसेवा संघटनेचे वतीने प्रसिद्ध करणेत आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages