टेंभुर्णी [ प्रतिनिधी ] विठ्ठल राव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पिंपळनेर युनिट नंबर एक व करकंब युनिट नंबर च्या सन 2019 ।20 च्या गळीत हंगामाची सांगता करण्यात आली तसेच 13 लाख 25 हजार 555 व्या साखर पोत्याचे पूजन ,जिल्हा परिषद सदस्य तथा इंडियन शुगर चे चेअरमन रणजित भैया शिंदे व संचालक वामन भाऊ उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले .या प्रसंगी कार्यकारी संचालक राजेंद्र रणवरे संचालक पोपट गायकवाड, प्रभाकर कुटे ,रमेश पाटील ,सुरेश बागल , वेताळ जाधव ,शिवाजी डोके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
.कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजना नंतर कारखान्याच्या युनिट नंबर 1 मध्ये उत्पादित झालेल्या 13 लाख 25 हजार 555 व्या साखर पोत्याचे पूजन रणजित शिंदे व वामन भाऊ उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी रणजित शिंदे म्हणाले की मागील वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे हा गळीत हंगाम अडचणीचा होता. कारखाना कार्यक्षेत्रात को 265 का कमी साखर उताऱ्याचा ऊस जास्त प्रमाणात होता यामुळे कारखान्यांच्या रिकव्हरी मधे घट झालेली आहे .भविष्यकाळात आपल्या कार्यक्षेत्रात सर्वत्र को 8005 कोसी 10001 हो 671 को 86032 या जादा साखर युक्त असलेल्या उसाची लागवड वाढवणे ही काळाची गरज आहे .रणजित शिंदे पुढे म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रात सांगली ,सातारा ,कोल्हापूर विभागातील साखर कारखान्याची रिकव्हरी 12 ते 13 टक्के पर्यंत असते व आपली दहा टक्के असते, कारण आपल्याकडे कमी साखर प्रतीचा जास्त उस असतो, तरीही पण आपण २५०० रुपये प्रति टन उसाचा भाव जाहीर केला आहे. .तिकडील कारखाने 2800 रुपये प्रति टन भाव देतात, प्रत्यक्षात त्यांनी आपल्यापेक्षा 700 ते 800 रुपये भाव जास्त द्यावा लागतो .ते पुढे म्हणाले की सध्या साखरेला उठाव कमी आहे तरीही जाहीर केलेला प्रतिटन भाव देण्यात अडचण नाही .आपल्याप्रास्ताविक मध्ये कार्यकारी संचालक राजेंद्र रणवरे म्हणाले की, अडचणीवर मात करून देखील विठ्ठलराव शिंदे युनिट नंबर 1 पिंपळनेर मध्ये 12लाख 60 हजार 535 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 13 लाख 25 हजार 555 क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे .साखर उतारा 10. 49% आहे तसेच करकंब येथील युनिट नंबर 2 मध्ये 57 दिवसात एक लाख 46 हजार 382 मेट्रिक टन ऊस गाळप करून 1 लाख 55 हजार वीस क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे ,साखर रिकव्हरी 10. 59 टक्के आहे. एकूण दोन्ही युनिटमध्ये 14 लाख 80 हजार 575 क्विंटल साखर उत्पादन करण्यात आली आहे ,तर 14 लाख सहा हजार 917 टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. रणवरे म्हणाले की जिल्ह्यातील एकूण गाळपाच्या 25% गाळप याच ठिकाणी झाले असून, पुढील हंगामात विक्रमी गाळप करण्याची तयारी सुरू आहे या कार्यक्रमास विभाग प्रमुख संभाजी थिटे पोपटराव एल पले ,सी एस भोगाडे, जनरल मॅनेजर सुहास यादव ,महेश भादुले ,लवटे ,देसाई , अनिल विर, मुटेकर, शशिकांत पवार ,पांडुरंग बागल, सुनील शिंदे, जगदीश देवडकर ,आदी मान्यवर उपस्थित होते .

No comments:
Post a Comment