गाव (टेंभुर्णी) येथे जिल्हा बँकेत महिला मेळावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 19, 2020

गाव (टेंभुर्णी) येथे जिल्हा बँकेत महिला मेळावा

गाव (टेंभुर्णी) येथे जिल्हा बँकेत महिला मेळावा

टेंभुर्णी [प्रतिनिधी ]  माढा तालुक्यातील टेंभुर्णी जवळआसलेल्या  निमगाव (टें) येथे जिल्हा बँकेच्या १०२ व्या वर्धापनादिनाचे औचित्य साधून बँकेच्या निमगाव शाखेने कृषिरत्न सुनंदाताई बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप झिले हे होते. कार्यक्रमास सरपंच रविंद्र शिंदे,पालक अधिकारी शशिकांत शिंदे,बँक निरीक्षक ए.के.बाबर,शाखाधिकारी के.बी.कांबळे,संजय पाटील हे उपस्थित होते.यावेळी जिल्हा व्यवस्थापक प्रदीप झिले यांनी बँकेचे कामकाज प्रगतीपथावर असून ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित आहेत असे सांगितले.सरपंच रविंद्र शिंदे,शशिकांत शिंदे यांनी विचार व्यक्त केले.प्रास्ताविक संतोष वरपे यांनी केले.कार्यक्रमास मोठया संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.कार्यक्रमासाठी ए.के.बाबर,के.बी.कांबळे,संजय पाटील,बी.टी.व्यवहारे,बी.एन.टोनपे,गुरुदेव अनभुले,बैरागी यांनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages