सांगोला नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी सोमनाथ गुळमिरे यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 7, 2020

सांगोला नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी सोमनाथ गुळमिरे यांची निवड

सांगोला नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी सोमनाथ गुळमिरे यांची निवड 


 सांगोला (जगन्नाथ साठे)  सांगोला नगरपालिकेच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी सांगोला महायुतीकडून उद्योगपती तथा युवा नेते सोमनाथ गुळमिरे  यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या बिनविरोध निवडीवेळी पीठासन अधिकारी म्हणून  नगराध्यक्षा राणीताई माने यानी  काम पाहिले.या वेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे, गटनेते आनंदा  माने,माजी नगरसेवक माऊली तेली,असमीर तांबोळी, गजानन भाकरे, अशोक भालके, राजेंद्र भंडारे, सोमनाथ कोरे, शशिकांत भोसले, बाळासो खटकाळे तसेच सांगोला शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 
     या नूतन निवडीवेळी सोमनाथ  गुळमिरे यानी आपणाला महायुतीकडून मिळालेल्या संधीतून सर्वसामान्यांची कामे आणि शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणाने करणार असल्याचे सांगून सर्वाना  बरोबरीने घेवून काम करणार  असल्याचे सांगितले. या वेळी सोमनाथ गुळमिरे मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.आणि निवड झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करीत सांगोला शहरातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सोमनाथ गुळमिरे  यांच्या हस्ते सांगोला शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांच्या या निवडीबद्दल सांगोला शहरातील लिंगायत समाजातील तात्या गुळमिरे,इंजिनिअर दयानंद गुळमिरे,,राजु गुळमिरे , नरेंद्र होनराव, तसेच लिंगायत समाजातील विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages