१२ फेब्रुवारीला होणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी होण्यासाठी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर आणि श्री रुपाभवानी देवी यांच्या चरणी साकडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 8, 2020

१२ फेब्रुवारीला होणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी होण्यासाठी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर आणि श्री रुपाभवानी देवी यांच्या चरणी साकडे

१२ फेब्रुवारीला होणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी होण्यासाठी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर आणि श्री रुपाभवानी देवी यांच्या चरणी साकडे 




सोलापूर, प्रतिनीधी - येथे १२ फेब्रुवारी २०२०, बुधवार या दिवशी हिंदु जनाजगृती समितीच्या वतीने भवानी पेठ येथील जयभवानी प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समिती ही धर्मजागृती, धर्मशिक्षण, धर्मरक्षण, धर्मसंघटन, राष्ट्ररक्षण यांसाठी कार्य करणारी संस्था आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर आणि श्री रुपाभवानी देवी यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून अनेक नागरिकांनी साकडे घातले, तसेच सभा यशस्वी करण्यासाठी स्थानिक व्यापारी, प्रतिष्ठित मंडंळींनी पुढाकार घेतला आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य करण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राजन बुणगे यांनी केले आहे. सभेविषयी लोकांना माहिती देण्यासाठी काही दिवसांपासून धर्मप्रेमींच्या बैठका घेणे, हस्तपत्रक, भित्तीपत्रक, रिक्षाफलक, ध्वनीक्षेपण यंत्रणा यांमांध्यमातून सभेच्या प्रसाराला वेग आला असून आसपासच्या तामलवाडी, पिंपळे (बुद्रुक), गंगेवाडी, कंदलगाव, यांसह अनेक गावांमध्ये तसेच सोलापूर शहरामध्ये सभेच्या प्रसार बैठकांच्या माध्यमातून सभेचे निमंत्रण देण्यात येत आहेत. सभेच्या प्रसाराअंतर्गत सोलापूर येथील नगरसेविका  राधिका पोसा यांनी तोगटवीर समाजाच्या ७५ महिलांना चौडेश्‍वरी देवीच्या मंदिरात एकत्र करून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सभेचा विषय मांडण्यास सांगितले. या ठिकाणी समितीच्या श्रीमती अलका व्हनमारे यांनी उपस्थित महिलांना सभेचे निमंत्रण देऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचे महत्त्व सांगितले, तर मार्कंडेय मंदिरात घेण्यात आलेल्या बैठकीत मार्कंडेय समाजाचे अनेक युवक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages