सहयाद्री फार्मसी महाविद्यालयात युफोरिया- 2k20 या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 7, 2020

सहयाद्री फार्मसी महाविद्यालयात युफोरिया- 2k20 या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

सहयाद्री फार्मसी महाविद्यालयात युफोरिया- 2k20 या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन




सांगोोला --सह्याद्री फार्मसी कॉलेज या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासाबरोबरच त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगिण व्यक्तीमत्व विकास करण्यासाठी विविध सांस्कृतिक, सामाजिक, वैज्ञानिक, कला व क्रिडा उपक्रम आयोजिले जातात. सहयाद्री कॉलेज ऑफ फार्मसी मेथवडे येथे युफोरिया- 2k20 या वार्षिक स्नेहसंमेलन 2019-20 या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 7 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. त्याअंतर्गत विविध कलागुणदर्शक, सांस्कृतिक, शैक्षणिक व खेळाचे बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. 31 फेब्रुवारी ते 6 मार्च या दरम्यान महाविद्यालयात विविध सांस्कृतिक दिवस साजरे करुन भारतातील विविध राज्याच्या पेहराव व संस्कृतीचे दर्शन घडविले. या दरम्यान फनफेअर, कलर डे, फेटा डे, सारी डे, टाय डे, फॅन्सी डे, ट्रॅडिशनल डे, चॉकलेट डे साजरे करण्यात आले. प्रत्येक त्या दिवशी विद्यार्थ्यांनी वेगवेगळया भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून उस्फूर्त सहभाग दर्शविला आणि त्यामधून विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली. दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रामध्ये युवा प्रेरणादायी व्याख्याते, समाज परिवर्तनकार  वसंत हंकारे यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे व यावेळी  रावसाहेब केंचप्पा पाटील, अध्यक्ष,  शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था संख, जत हे सुध्दा कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. व दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांचे विविध कलागूणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रामध्ये महाविद्यालयात सहयाद्री कॉलेज ऑफ फार्मसी अल्युमिनी असोसिएशन मेथवडे च्या वतीने माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये विनोदी हास्यसम्राट फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचा विनोदी हास्यकल्लोळ कार्यक्रम होणार आहे. व त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे विविध कलागूणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा सर्व विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलिपकुमार इंगवले सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील सर व सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages