खंडू चांडोले व किरण झावरे यांचा अवयवदान व नेत्रदानाचा संकल्प! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 7, 2020

खंडू चांडोले व किरण झावरे यांचा अवयवदान व नेत्रदानाचा संकल्प!


खंडू चांडोले व  किरण झावरे यांचा  अवयवदान व  नेत्रदानाचा संकल्प!

सांगोला (प्रतिनिधी)-  चांडोलेवाडी येथील खंडू पोपट चांडोले व गोडसेवाडी येथील किरण संतोष झावरे यांनी अवयवदान व नेत्रदानाचा फॉर्म भरून आपुलकी प्रतिष्ठान कडे गुरुवारी सुपूर्द केला. 
सांगोला शहरात देहदान, अवयवदान व नेत्रदान जनजागृती रॅली काढण्यात आली.  या रॅलीनंतर  इच्छुकांनी आपुलकी प्रतिष्ठानकडे फॉर्म भरून देण्यास सुरुवात केली आहे. चांडोलेवाडी येथील खंडू पोपट चांडोले व गोडसेवाडी येथील किरण संतोष झावरे यांनी अवयवदान व नेत्रदानाचा फॉर्म भरून आपुलकी प्रतिष्ठान कडे सुपूर्द केला. फॉर्म भरून दिल्यानंतर उपस्थित आपुलकीच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. नेत्रदान, देहदान व अवयवदानाची चळवळ वाढवण्यासाठी आपुलकी प्रतिष्ठान मार्फत विशेष असे प्रयत्न चालू असून इच्छुकांनी  संतोष महिमकर (७६२०६५७११२), किशोर पोफळे (९९७०१५२८८४), सुनिल मारडे (९६०४९६९३४३),किंवा राजेंद्र यादव (९०११७०७०८०) यांचेशी संपर्क साधून फॉर्म भरून द्यावेत, असे आवाहन आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages