कर्मवीर मामासाहेब जगदाळे हे व्यक्ती नव्हे तर आदर्श विचार होते - उदय करडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 5, 2020

कर्मवीर मामासाहेब जगदाळे हे व्यक्ती नव्हे तर आदर्श विचार होते - उदय करडे

कर्मवीर मामासाहेब जगदाळे हे व्यक्ती नव्हे तर आदर्श विचार होते - उदय करडे



बार्शी(प्रतिनिधी):"कर्मवीर मामासाहेब जगदाळे हे व्यक्ती नव्हे तर आदर्श विचार होते,"असे मत वास्तूविषारद उदय करडे  यांनी व्यक्त केले. थोर शिक्षणमहर्षी कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांची ११७ वी जयंती कर्मवीर ग्रंथालयात साजरी करण्यात आली त्यावेळी ते प्रमुख म्हणून बोलत होते,कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मा.लक्ष्मण दादा देशमुख हे होते. प्रथमत: डॉ मामासाहेब जगदाळे यांचे प्रतिमीचे पुजन प्रमुख मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.पुढे बोलताना करडे म्हणाले की,मामांनी आपल्या उत्तूंग कार्यामुळे भगवंताच्या बार्शीला ज्ञानवंतांची,प्रतिभावंतांनी,कलावंतांची बार्शी अशी ओळख ओळख निर्माण करुन दिली.मामांची आदर्श विचारांची शिदोरी जतन करुन तरुणांनी बार्शीच्या लौकिकात भर घातली पाहिजे.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बार्शी कला अकादमीचे अध्यक्ष राजेश खाडे,विजयसिंह देशमुख,बप्पा सुतार,लक्ष्मण देशमुख,राजेश गडदे,बुध्दप्रिय कांबळे यांनीही यथोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी केले.यावेळी आकाश बोकेफोडे,प्रेम अग्रवाल,शाम जानराव,करण बोकेफोडे,सचिन दराडे यांचेसह अनेक वाचक सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार हनुमंत तुपे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages