श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रेरणास्त्रोत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांची ११७ वी जयंती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 3, 2020

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रेरणास्त्रोत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांची ११७ वी जयंती

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रेरणास्त्रोत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांची ११७ वी जयंती 



बार्शी तालुका (प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रेरणास्त्रोत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांची ११७ वी जयंती 'समाजदिन' म्हणून मोठ्या उत्साहाने व विविध समाज प्रबोधनपर कार्यक्रमाने रविवारी दि.२ फेब्रुवारी, ते ४ फेब्रुवारी २०२० या तीन दिवशी साजरी करण्यात येणार आहे. संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी दि.२ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५:०० वाजता ह.भ.प. अशोक पाटील महाराज(महागावकर)यांचे समाज प्रबोधनपर किर्तन होणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता संस्थेतील सेवानिवृत्त कर्मचारी, गुणवंत शिक्षक व विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचा सत्कार सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व इंदापूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या उपस्थितीत तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय.यादव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. त्याच दिवशी दुपारी ३:०० वाजता तीन तासांचा संस्थेच्या विविध शाखांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम होईल. तिसऱ्या दिवशी दि. ०४ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी तुळजापूर ते बार्शी दौड करुन कर्मवीर प्रेमी युवक 'कर्मवीर ज्योत' कर्मवीरांच्या पुतळ्याजवळ आणणार आहेत. तिचे स्वागत व दौडीतील सर्वांचा सत्कार संस्थेचे सर्व घटक करतील. त्यानंतर सकाळी बार्शी शहरातून संस्थेच्या विविध शाखांची भव्य जनजागरण मिरवणूकीचा प्रारंभ मामांच्या पुतळ्यापासून होईल. त्यात विविध विषयांवरील चित्ररथ, लेझीम, टिपऱ्या, झांज, पथनाट्य इत्यादी पथके असतील. दरवर्षी संस्थेतील सर्व पदाधिकारी, सदस्य, संस्थेतील कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी व बार्शीतील संस्थाप्रेमी नागरिक उस्फूर्त सहभागी होतात. मिरवणूक पहावयास बार्शीच्या आजूबाजूच्या गावातील लोकांची गर्दी असते. ही मिरवणूक सुमारे तीन तास चालते. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्रा डॉ. गोपाळ गुरू असून 'श्रीराम पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. या दोन्ही पाहुण्यांचा व्याख्यानाचा लाभ बार्शीकरांना होणार आहे. या कार्यक्रमात वीरमाता व वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. याप्रसंगी खासदार ओम राजेनिंबाळकर,आ. राजेंद्र राऊत,माजी आ. दिलीप सोपल,नगराध्यक्ष आसिफ तांबोळी उपस्थिती राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी विष्णू पाटील,पी.टी.पाटील,दिलीप येवनकर, जयकुमार शितोळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages