छत्रपती ग्रुपकडून वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ जपण्याचा प्रयत्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 3, 2020

छत्रपती ग्रुपकडून वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ जपण्याचा प्रयत्न


छत्रपती ग्रुपकडून  वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ  जपण्याचा प्रयत्न

छत्रपती ग्रुपकडून वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ  जपण्याचा प्रयत्न - उपअधीक्षक भोरे शिवजयंती निमित्त शिबिरात तब्बल २१९ दात्यांचा सहभाग बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) मोफत जिम ,रक्तदान,आरोग्य तपासणी शिबीर,सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून छत्रपती ग्रुपने  सामाजिक आणि वैयक्तिक आरोग्य जोपासण्याचा प्रयत्न केला असे मत पोलीस उपअधीक्षक  डॉ सिद्धद्धेश्वर भोरे यांनी व्यक्त केले ते शिवजयंती निमित्त छत्रपती ग्रुपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, प्रगतशील शेतकरी भीमराव पवार, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ कुमार जगताप , डॉ गणेश सातपुते, छत्रपती ग्रुपचे संस्थापक विजयसिंह पाटील, शशांक गुगळे,वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे,नगरसेवक पिनू काकडे, पत्रकार संजय बारबोले, गणेश गोडसे,उद्योजक , रवीआण्णा राऊत,विलास राऊत , दीपक तलवाड, विजय कोरे आदी  उपस्थित होते यावेळी तब्बल२१९ दात्यांनी सहभाग नोंदवला डॉ भोरे पुढे म्हणाले की  छत्रपती ग्रुपने सामाजिक गरज ओळखून दीडशे मुलींच्या नावे पाच हजार रुपये ची संक्षिप्त ठेव, विधवा गरीब दीडशे महिलांना मोफत पीठ गिरणी आणि शिलाई मशीन, दीडशे गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप आणि मागील पाच वर्षांच्या शिबिरातून सुमारे अडीच हजार रक्त बाटल्यांचे संकलन तसेच तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी मोफत अत्याधुनिक जिम सेंटरची उभारणी करून सामाजिक आणि वैयक्तिक स्वास्थ्य राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत असे मत व्यक्त केले यावेळी डॉ कुमार जगताप म्हणाले की छत्रपती ग्रुपने  नावाप्रमाणेच अनुकरणशील असे उपक्रम राबविले आहेत  सूत्रसंचालन ऍड भगवंत पाटील यांनी केले तर आभार बापू पवार यांनी मानले शिबीर यशस्वीतेसाठी टिंकू पाटील,मिलिंद जाधव, अमोल पाटील ,पिंटू राऊत,पंकज पाटील, रोहित वाघमारे,दीपक धावरे,सागर उमाटे ,सारंग चौगुले, राम पाटील, राज देवकुळे,दीपक बिडवे,समाधान राऊत,देवा कुलकर्णी, आदीं सह भगवंत रक्तपेढी च्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages