ज्युनिअर्स ग्लोबल प्रि स्कूल,बार्शी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 3, 2020

ज्युनिअर्स ग्लोबल प्रि स्कूल,बार्शी

ज्युनिअर्स ग्लोबल प्रि स्कूल,बार्शी 


ज्युनिअर्स ग्लोबल प्रि स्कूल बार्शी चे १ ले वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. गणेश गोटे, संदीप पाटील, उमेश काळे, अतुल पाडे यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, ज्योतीबा फुले सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात झाली. शाळेत घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या व महिला पालकांच्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, राजे.. , तुफान आलंया, आता माझी सटकली... वगैरे गाण्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे समूह नृत्ये सादर केली. त्यातील मुलींनी मेरे पापा... ह्या गाण्यावर नृत्यात पालकांना मंचावर बोलावण्यात आल्यावर पालक आपल्या मुलींसोबत अतिशय भावूक झाले. या वार्षिक संमेलनाचे प्रास्ताविक किरण गायकवाड सर यांनी केले तर, गणेश गोटे सर, संदीप पाटील सर आणि अतुल पाडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्नेहसंमेलनाचे नृत्यदिग्दर्शन करणाऱ्या सुकन्या परदेशीमठ तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या साखरे मॅडम यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. पूनम गलांडे मॅडम यांनी आभार प्रदर्शन करुन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगताप मॅडम, गायकवाड मॅडम, गलांडे सर आणि जगताप सर तसेच शाळेच्या शिक्षिका पठण मॅडम, काळे मॅडम, शेख मावशी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages