माघवारी पालखी सोहळ्यातील कुरुल येथील दुसरे गोल रिंगण उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, February 2, 2020

माघवारी पालखी सोहळ्यातील कुरुल येथील दुसरे गोल रिंगण उत्साहात

माघवारी पालखी सोहळ्यातील कुरुल येथील दुसरे गोल रिंगण उत्साहात

कुरुल :माघवारी पालखी सोहळा - २०२० माघ शुध्दषष्ठीला सुरुवात झाली तिर्‍हे मार्गे पंढरपूरला पायी चालत जाणार्‍या दिंडांचे अखिल भारतीय वारकरी मंडळ तसेच प्रदेशाध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली एकत्रीकरण करुन पाटकर नगर, कुरुल, ता. मोहोळ येथे दरवर्षी भव्य गोल रिंगण केले जात आहे.  कुरुल ग्रामस्थांच्या वतीने या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. दिंडीतील सर्व भाविकांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. तद्नंतर रिंगणाचे अश्‍व मुख्य स्थळावर आणण्यात आले. 
कुरुल भजनी मंडळाच्या वतीने रविवार २ फेब्रुवारी रोजी माघवारी पालखी सोहळ्यातील कुरुल येथील दुसरे गोल रिंगण उत्साहात पार पडला. 
              यावेळी पालखी व अश्‍वाचे पूजन करण्यात आले. दिंडी प्रमुख व विणेकरी महाराजांचा संयोजकांकडून सत्कार करण्यात आला. ज्योतीराम चांगभले (जिल्हाध्यक्ष),  बळीराम जांभळे (जिल्हा सचिव),शहराध्यक्ष संजय पवार,  गोरख शिंदे, रमेश शिंदे, मोहन शेळके, सुमंत शेळके या पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला आणि गोल रिंगण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला.या परिसराला पंढरपूरचे रुप प्राप्त झाले होते.प्रथम ध्वजाधारी भाविकांचे उत्साहात रिंगण पूर्ण झाले. मृदंग - टाळकरी भाविकांचे रिंगणही पूर्ण झाल्यानंतर तुळसधारी महिलांचे रिंगण पूर्ण झाले. तपोवृध्द असणार्‍या विणेकर्‍यांचे रिंगण पूर्ण झाल्यानंतर अश्‍वाच्या रिंगणाला सुरुवात झाली आणि वातावरणामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. ज्ञानोबा तुकाराम या नामाच्या गजरात रिंगण पूर्ण झाले आणि पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. महिलांचा प्रतिसाद खूपच होता. कुरुल परिसरातील भाविकांची प्रचंड गर्दी होती. प्रत्येक भाविकाच्या चेहर्‍यावर समाधान दिसत होते. 
                 हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळ, सोलापूर व माणिक पाटील, शत्रुघ्न जाधव, महादेव माळी... इत्यादि  कुरुल ग्रामस्थ - भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages