शिवजयंतीनिमित्त रंगभरण स्पर्धेचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 3, 2020

शिवजयंतीनिमित्त रंगभरण स्पर्धेचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त रंगभरण स्पर्धेचे आयोजन 

डाॅ.पंजाबराव देशमुख संघटनेचा उपक्रम सोलापुर— छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन डाॅ.पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परिषदेच्यावतीने जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन केल्याची माहीती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे यांनी दिली. स्पर्धेचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे.ही स्पर्धा शाळा स्तरावर घेण्यात येणार आहे.स्पर्धा एकुण चार गटात घेतली जाणार आहे.गट पहिला—इयत्ता १ली व २री,गट दूसरा—इ.३री व ४थी,गट तिसरा—इ.५वी व ६वी ,गट चौथा—इ.७वी व ८ वी.प्रत्येक गटातुन प्रथम,द्वितीय,तृतीय  व दोन उत्तेजनार्थ अशा  पाच विद्यार्थ्यांचा गौरव केला जाणार आहे.स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे.स्पर्धेची नाव नोंदणी ८ फेब्रुवारी पर्यंत शिवप्रभु झेराॅक्स सेंटर,जिल्हा परिषद व सप्तर्षि ग्राफीक्स,घोंगडे वस्ती,सोलापुर येथे करावी.यासाठी  ९९२१८८७१८१ (विनोद आगलावे) यांच्याशी संपर्क साधावा.स्पर्धेत जास्तीत शाळांनी सहभागी व्हावे,असे आवाहन,संतोष भद्रशेट्टी,अनिल गायकवाड,दिपक डांगे,प्रकाश बाळगे,विशाल पवार,हणमंत भोसले,सिद्धेश्वर पवार,नितीन भांगे,धन्यकुमार स्वामी,संतोष रजपुत व अजित कणसे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages