Hot Posts

6/recent/ticker-posts

कोळा आदर्श ग्रामीण पतसंस्थेने नागरिकांना आर्थिक स्वावलंबन दिले-- माजी आ.डॉ. गणपतराव देशमुख

कोळा आदर्श ग्रामीण पतसंस्थेने नागरिकांना आर्थिक स्वावलंबन दिले-- माजी आ.डॉ. गणपतराव देशमुख 

   कोळा आदर्श ग्रामीण पतसंस्थेच्या नूतन इमारतीचा उदघाटन व पतसंस्थेचा स्थलांतर सोहळा उत्साही वातावरणात संपन्न.

सांगोला (जगन्नाथ साठे) कोळा आदर्श ग्रामीण पतसंस्था मर्यादित कोळा( तालुका कार्यक्षेत्रे)  या पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व पतसंस्थेचा स्थलांतर समारंभ उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गणपतराव देशमुख यांनी कोळा आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने कोळा भागातील नागरिकांना, युवकांना व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक असणारा कर्जपुरवठा करून त्यांना आर्थिक स्वावलंबीत्व दिले आहे, त्यामुळे आदर्श ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे कार्य उत्कृष्ट आहे. गेली 15 वर्ष कोळा भागात आणि तालुक्यातील लोकांनाआर्थिक स्थिरता प्राप्त करून देण्यात कोळा आदर्श ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचा महत्त्वाचा वाटा आहे. आज नूतन इमारतीचे उद्घाटन समारंभ आणि पतसंस्थेचे स्थलांतर समारंभ संपन्न होत असून संस्थापक संभाजी आलदर,पटसंस्थेचे  चेअरमन सीताराम सरगर आणि संचालक मंडळांना मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि त्यांनी उत्तरोत्तर कॊळा भागातील नागरिकांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी भविष्यात ही  प्रयत्न करावे, असे प्रतिपादन माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन प्रबुद्धचंद्र झपके ,सभापती राणीताई कोळवले, समाज कल्याण सभापती संगीता धांडोरे, भाजपा तालुका अध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख, फॅबटेक मल्टीस्टेट चे चेअरमन भाऊसाहेब रूपनर, ज्येष्ठ नेते सुभाष नाना पाटील,उपसभापती तानाजी चंदनशिवे, कोळे गावचे सरपंच शहाजी हातेकर,कृषी सेवा अर्बन बँकेचे चेअरमन आप्पासाहेब सरगर,सोलापूरचे लेखापरीक्षक जेबी मुश्रीफ ,गटविकास अधिकारी संतोष राऊत ,कॉन्टॅक्टर दिलीप तनपुरे, संस्थापक अध्यक्ष संभाजी आलदर, पतसंस्थेचे चेअरमन सिताराम सरगर, जि प सदस्य सचिन देशमुख,व्हाईस चेअरमन सिकंदर पटेल, माजी सभापती बाळासाहेब काटकर, पंचायत समिती सभापती दिगंबर शिंगाडे, नारायण जगताप,पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले,माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, माजी  हणमंत कोळवले,मॅनेजर विलास सरगर, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
      या वेळी प्रबुद्धचंद्र झपके यांनी  आपल्या मनोगतातून कोळा आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद असून या भागातील गोरगरीब जनतेला अडचणीच्या काळात नेहमीच संस्थापक अध्यक्ष, आणि चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि त्यांच्या संचालक मंडळाने सहकार्य केलेले आहे.या भागात उद्योग धंदा वाढवण्यासाठी नक्कीच कोळा आदर्श बिगरशेती पतसंस्थेने केलेले कार्य कौतुकास्पद आहे. युवकांच्या हाताला काम देवून बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि त्यांना उद्योगधंद्यांमध्ये उभे करण्यासाठी कोळा आदर्श ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे कार्य मोलाचे ठरत असून  कोळा आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संभाजी आलदर, चेअरमन सिताराम सरगर,व्हाईस चेअरमन सिकंदर पटेल आणि त्यांच्या संचालक मंडळांनी येणाऱ्या काळातही उत्तरोत्तर पतसंस्थेच्या माध्यमातून प्रगती करावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन त्यांनी सर्व संचालक मंडळांना शुभेच्छा दिल्या.
      तर भाजपा तालुका अध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांनीही कोळा आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि पतसंस्थेच्या स्थलांतर कार्यक्रमा साठी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कोळाआदर्श ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने कमी कालावधीत लोकांच्या गरजा पुरवण्यासाठी सुसज्ज इमारत आणि लॉकर्सची केलेली सोय नक्कीच कौतुकास्पद आहे.या भागातील नागरिकांना पैशाची गरज भागवून कर्जपुरवठा करून ठेवीदार वाढवून वेगवेगळ्या योजना राबवून लोकांना लोकांच्या पसंतीस उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पतसंस्थेने केला असल्याची भूमिका यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
      तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थापक अध्यक्ष संभाजी तात्या आलदर यांनी आपल्या प्रास्ताविकातून उपस्थितांचे  स्वागत करून कोळा आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या एकूण सभासद, वसूल भागभांडवल, ठेवी, कर्जे इतर निधी गुंतवणूक मालमत्ता आणि नफा तसेच खेळते भांडवल आज अखेरची उलाढाल  हे सविस्तर सांगून 4 मार्च 2005 साली स्थापन झालेल्या आदर्श ग्रामीण पतसंस्थेचे वाटचाल कशा पद्धतीने यशस्वीतीकडे जात आहे,याचा लेखाजोखा मांडला. यावेळी सुभाष पाटील,आनंदा सरगर ,मारुती सरगर, जि प सदस्य सचिन देशमुख गजेंद्र कोळेकर, भाऊसाहेब रुपनर, राणीताई कोळवले मॅनेजर विलास सरगर आदींनी आपले मनोगत व्यक्त करून आदर्श ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला शुभेच्छा दिल्या.यावेळी  कोळा आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सिताराम सरगर, व्हाईस चेअरमन सिकंदर पटेल,तसेच संस्थेचे सभासद ग्राहक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments