सांगोला येथील बिल्डर सोमनाथ झिंजुर्टे यांचा देहदान व नेत्रदानाचा संकल्प - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 3, 2020

सांगोला येथील बिल्डर सोमनाथ झिंजुर्टे यांचा देहदान व नेत्रदानाचा संकल्प

सांगोला येथील बिल्डर सोमनाथ  झिंजुर्टे यांचा  
देहदान व नेत्रदानाचा संकल्प 
सांगोला (प्रतिनिधी) - सांगोला येथील बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेले सुप्रसिद्ध बिल्डर सोमनाथ झिंजुर्टे यांनी  देहदानाचा  व नेत्रदानाचा फॉर्म भरून आपुलकी प्रतिष्ठान कडे सोमवारी सुपूर्द केला. 
        सांगोला येथे सामाजिक कार्य करणाऱ्या विविध सामाजिक संघटना तसेच शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक यांच्या सहकार्याने गेल्या सोमवारी  सांगोला शहरात देहदान, अवयवदान व नेत्रदान जनजागृती रॅली काढण्यात आली.  या रॅलीनंतर नेत्रदान व देहदान करणाऱ्या इच्छुकांनी आपुलकी प्रतिष्ठान  सदस्यांकडे फॉर्म भरून देण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून सांगोला येथील बिल्डर असोसिएशन चे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ झिंजुर्टे यांनी फॉर्म भरून दिल्यानंतर उपस्थित आपुलकीच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
            नेत्रदान, देहदान व अवयवदानाची चळवळ वाढवण्यासाठी फॉर्म भरून घेण्याची मोहीम चालू असून इच्छुकांनी कुलदीप इलेक्ट्रॉनिक्स शिवाजी चौक सांगोला या ठिकाणी संपर्क साधून फॉर्म भरून द्यावेत, असे आवाहन आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages