चीनमधून परतलेल्या प्रवाशांवर विशेष लक्ष करोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी घेतली बैठक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 4, 2020

चीनमधून परतलेल्या प्रवाशांवर विशेष लक्ष करोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी घेतली बैठक

चीनमधून परतलेल्या प्रवाशांवर विशेष लक्ष  करोना विषाणू संसर्ग 

प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी घेतली बैठक 





चीनमधून परतलेल्या प्रवाशांवर विशेष लक्ष  करोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी घेतली बैठक सोलापूर दि. 3 : चीनमधून  परत आलेल्या अथवा चीनमधून परतलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिल्या. करोना विषाणूच्या संसर्गाबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी  आज बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.   बैठकीस सोलापूर महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार आदी उपस्थित होते. डॉ.प्रदीप ढेले यांनी सादरीकरणाद्वारे करोना विषाणू संसर्ग आणि लागण झाल्यास लक्षणे, घ्यायची काळजी याबाबत माहिती दिली.  त्यांनी सांगितले की, चीनमधून 15 जानेवारी 2020 नंतर परत आलेल्या अथवा अशा प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.  याबाबत राज्यस्तरावर पुणे आणि मुंबई येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  मात्र दक्षतेचा भाग म्हणून सर्वोपचार रुग्णालयात एक कक्ष सुरु करण्यात आला आहे.शंभरकर यांनी सांगितले की, चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवाच, त्याचबरोबर आजूबाजूच्या देशांतून परतणाऱ्या प्रवाशांवरही लक्ष ठेवा.या आजाराबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करा.जिल्हा परिषद, महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभागाची इस्पितळे येथे करोना विषाणूबाबत माहिती व्हावी यासाठी पोस्टर्स लावा. "  खासगी इस्पितळात उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी  संशयास्पद लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची माहिती राज्यस्तरीय कक्षांकडे पाठवण्यात यावी. यासाठी निमा, आय एम ए संस्थांची मदत घ्यावी.   शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे येथे करोना विषाणू आणि त्याची लागण झाल्यास आढळणारी लक्षणे यांची  माहिती देण्याची व्यवस्था करावी .  यासाठी महानगरपालिका,  जिल्हा परिषद आणि नगरपालिकांचे सहाय्य घ्यावे, असे त्यांनी सांगितले.बैठकीस अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माधवी रायते, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष नवले, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. मदन देशपांडे, डॉ. विलास सरवदे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages