Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला सर्वतोपरी ताकद देऊन उभी करण्यासाठी मदत करू

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला सर्वतोपरी ताकद देऊन उभी करण्यासाठी मदत करू



बोरामणी- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला सर्वतोपरी ताकद देऊन उभी करण्यासाठी मदत करू, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र जी पवार साहेब हे विद्यार्थी दशेतुनच राजकारणात आले,आज त्यांचा आदर्श संपूर्ण देश घेतो, विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य राजकीय धडे मिळाल्यास देशाला सक्षम लोकशाही मिळू शकते म्हणुनच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वाढणे गरजेचे आहे. आज भरकटलेल्या राजकारणाला आणि दिशाहीन झालेल्या युवकाला पवार साहेबांचे विचारच तारु शकतात असे प्रतिपादन राष्ट्रवादी दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष प्रा.राज साळुंखे यांनी व्यक्त केले. दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी सुरज जाधव यांच्या निवडीप्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा.राज साळुंखे यांच्या हस्ते सुरज जाधव यांना निवडीचे पत्र देण्यात आले. पुढे बोलताना प्रा.राज साळुंखे यांनी विद्यार्थी शिबिर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावे आदी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देऊ असे प्रतिपादन केले.सुरज जाधव यांनी काका साठे, प्रा. राज साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली व अजिंक्यराणा पाटील, गणेश बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढविण्यासाठी काम करण्याची ग्वाही दिली. या प्रसंगी सुहास भोसले व विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments