रमाई आवास योजनेतूनउभारणार 2473 घरकुले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 4, 2020

रमाई आवास योजनेतूनउभारणार 2473 घरकुले

रमाई आवास योजनेतूनउभारणार 2473 घरकुले                                  






सोलापूर .दि. 4:- रमाई आवास योजनेतून जिल्ह्यातील अकरा तालुक्यात 2473 घरकुले उभारली जाणार आहेत. पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या घरकुलांना मंजुरी दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील बेघरांना हक्काचा निवारा उपलब्ध होणार आहे, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, 2019-20 आर्थिक वर्षात राज्य पुरस्कृत रमाई घरकुल योजनेंतर्गत एकुण 2645 घरकुल उभारण्याचे उदिष्ट्य होते. मात्र तालुक्यातून 228 जादा घरकुलांची मागणी आली होती. या जादाच्या मागणीस मंजुरी द्यावी अशा सूचना पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या. प्रजासत्ताक दिनी झालेल्या या बैठकीत घरकुलाचा दर्जा चांगला असावा. घरकुले उभारताना गुणवत्ता जोपासली जावी, अशा सूचनाही. दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्याचे  नवाळे यांनी सांगितले.बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, सहाय्यक आयुक्त कैलास आढे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे उपस्थित होते


रमाई आवास योजनेतून मंजुरी मिळालेली घरकुले

अ.क्र.
तालुका
पात्र मंजूर लाभार्थी संख्या
1
अक्कलकोट
180
2
बार्शी
315
3
करमाळा
180
4
माढा
150
5
माळशिरस
351
6
मंगळवेढा
210
7
मोहोळ
280
8
पंढरपूर
326
9
सांगोला
240
10
उत्तर सोलापूर
85
11
दक्षिण सोलापूर
156

एकूण
2473

























No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages