पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 7 फेब्रुवारीला आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 4, 2020

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 7 फेब्रुवारीला आयोजन

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 7 फेब्रुवारीला आयोजन


पुणे दि.4 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 7 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स,मॅनेजमेंट बिल्डींग, महर्षी कर्वे विद्या विहार, कर्वे रोड पुणे येथे पंडीत दीनदया उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  या मेळाव्यासाठी पुणे शहर, भोसरी, व पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील एकूण 32 उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून एकूण 3132 रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. यास्तव किमान 10 वी 12 वी, कोणत्याही शाखेचा  पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा होल्डर, व इंजिनिअरिंग, हॉटेल मॅनेजमेंट, फिजियोथेरेपिस्टग्राफिक डिझायनरसोशल मीडिया मार्केटिंगडिजिटल मार्केटिंग अशा सर्व पात्रताधारक उमेदवारांनी उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा, महिला उमेदवारांसाठीदेखील अनेक संधी उपलब्ध असल्याने त्यांच्यासह इतर सर्वच इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांच्या अधिक माहितीसाठी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून आपले पसंतीक्रम नोंदवावेत. खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जास्तीत जास्त नोकरी इच्छूक उमेदवारांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा  तसेच मेळाव्यास उपस्थित राहताना आपली सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट साईज छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या प्रती व आधारकार्डाच्या प्रती सोबत आणावीतया सुवर्णसंधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रांच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार वच एस.एन.डी.टी. कॉलेजच्या प्राचार्य डॉ. मुक्तजा मठकरी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages