नागरिकत्वा वर माकपची कार्यशाळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 4, 2020

नागरिकत्वा वर माकपची कार्यशाळा

नागरिकत्वा वर माकपची कार्यशाळा

नागरिकत्वा वर माकपची कार्यशाळा बुधवारी माकप कडून शाहीनबाग आंदोलनात सहभाग धर्मनिरपेक्षतेला मातीत गाडण्याची यंत्रणा हाणून पाडा - कॉ नरसय्या आडम (मास्तर)  सोलापूर दिनांक -  वर्षानुवर्षे  गुलामगिरीत पिचत असलेल्या बहुजनांना मुक्त करण्यासाठी विषमतेची पाळंमुळं असणारी मनुस्मृती चे दहन केले.मात्र आज केंद्र सरकार या देशात पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि मनुस्मृती ची घटना लादण्याचा मनसुबा रचलेला आहे.अर्थातच ही धर्मनिरपेक्षतेला मातीत गाडण्याची यंत्रणा आहे, ती हाणून पाडली पाहिजे आणि संविधानाचे रक्षण केले पाहिजे. सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सांय 5 वाजता  पक्षाचे मध्यवर्ती कार्यलाय दत्त नगर येथे नगरसेविका कामीनीताई आडम यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकत्व विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.  ते बोलताना पुढे म्हणाले की, मोदी अमित शहा यांनी  सी सी ए , एन आर सी, एन पी आर चा बॉम्ब टाकून भारतीयांना एक प्रकारचा मानसिक धक्का दिलेला आहे.
1.कारण 1 एप्रिल पासून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी सुरू होईल आणि यात 21 पुरावे सादर करावे लागतील
2.त्यांनंतर ते नोंदणी पडताळणी करतील आणि यात काही साशंकता निघत असेल तर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी मार्फत नोटीस बजावतील.
3.ज्यांचे नागरिकत्व सिद्ध होत नाही त्यांना आंतरराष्ट्रीय लवादापुढे जावे लागेल.  
4.जर तुम्हाला तुरुंगवास झाला तर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागेल. 
ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून नागरिकत्व सिद्ध करणे ही राष्ट्रीय समस्या बनेल हा या देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी धोका आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली आरक्षणाची संरक्षित भिंत जमीनदोस्त करून एकतर्फी हिंदुत्व रुजवणे आणि हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण करण्याचा अजेंडा आहे. दिल्लीच्या धर्तीवर आधारित सोलापुरात शाहीनबाग आंदोलनात सहभागी होण्यासाठी  बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी  माकपच्या वतीने सर्व महिला कार्यकर्ते उतरतील.यात सर्वांनी संविधान वाचवण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर माकपचे जिल्हा सचिव अँड एम एच शेख,सिध्दपा कलशेट्टी,व्यंकटेश कोंगारी,कुरमय्या म्हेत्रे,युसूफ मेजर, नलिनीताई कलबुर्गी,नसीमा शेख, शेवंताताई देशमुख, फातिमा बेग, आदी उपस्थित होते. प्रास्तविक अँड एम एच शेख यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल वासम यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages