याची देही याची डोळा | पाहिला गोल रिंगण सोहळा || नार्थकोट मैदानवर रंगला नयनरम्य गोल रिंगण सोहळा || - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 31, 2020

याची देही याची डोळा | पाहिला गोल रिंगण सोहळा || नार्थकोट मैदानवर रंगला नयनरम्य गोल रिंगण सोहळा ||

याची देही याची डोळा | पाहिला गोल रिंगण सोहळा ||
नार्थकोट मैदानवर रंगला नयनरम्य गोल रिंगण सोहळा ||




सोलापूर : माघवारीला पंढरपूरकडे पायी चालत जाण्याची 200 वर्षाची मोठी परंपरा सोलापूरमध्ये आहे.
पंढरीची वारी जयाचिये कुळी | त्याची पायी धुळी लागो मज || या न्यायाने सोलापूर मध्ये प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या भक्तिमय वातावरणात हा रिंगण सोहळा पार पडला. पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥ या उक्तीप्रमाणे वारकरी अधिकाराने अतिउच्च असून सुद्धा तो सर्वांबरोबर सामान्याप्रमाणे दिंडीमध्ये पायी चालत पंढरीला जाते. 
             शुक्रवार दि.31/01/2020 रोजी दुपारी 3.00 वा. श्री मार्कंडेय मंदिर लक्ष्मी मार्केट सोलापूर येथे श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीचे पूजन ह.भ.प.लक्ष्मण महाराज चव्हाण, महेश जाधव यांच्या हस्ते व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीचे पूजन नागनाथ पाटील, सुभाष शिंदे महाराज, सुमंत शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्री मार्कंडेय मुनींची आरती अरूण अवताडे, दगडू डोंगरे(मंगरूळ), रमेश शिंदे(नांदेड) यांच्याकडून केली. वारकरी प्रथेप्रमाणे नैमितिक भजनानंतर उपस्थित प्रत्येक दिंडीचा सन्मान पद्मशाली ज्ञाती संस्थे तर्फे करण्यात आला. तसेच दिंडीतील महिलांना डॉ.राजकुमार आडकर(माढा) यांच्याकडून तुलसी वृदावंन देऊन सन्मानित करण्यात आले. तद्नंतर हा पालखी सोहळा दु.4.30 वा. नॉर्थकोट मैदानावर आल्यानंतर पाऊल फुगडी वगैरे खेळ खेळले.
                जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्योतीराम चांगभले, जिल्हा उपाध्यक्ष बंडोपंत कुलकर्णी, शहराध्यक्ष संजय पवार यांच्या मार्गदर्शनाने वारकरी पाऊल,फुगडी खेळ खेळले. भव्य दिव्य असे गोल रिंगण, जिल्हा सचिव ह.भ.प.बळीराम जांभळे, कुमार गायकवाड, तानाजी बेलेराव, किसन कापसे यांच्याकडून लावून घेतले. या मैदानावर महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक शिवानंद पाटील, भाऊसाहेब लामकाने, आ.विजयकुमार देशमुख, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे, अमोल शिंदे,विनोद भोसले,सुनील कामाटी,  शिवानंद पाटील,  जि.प.सदस्य उमेश पाटील, अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय राजे, अनिकेत पिसे,निर्मला ठोकळ,पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, ह.भ.प.गुरूदास तोडमे गुरूजी यांच्या हस्ते अश्‍वाचे व पालखीचे पूजन होऊन रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला.
         पाहे पा ध्वजेचे चिरगूट । राया जातन करीता कष्ट ॥ या उक्तीप्रमाणे ध्वजेधारी वारकरी रिंगण पुर्ण केले. त्यानंतर तुळशी वृंदावनधारी महिला व पखवाज वादकांचे रिंगण झाले. विणेकरी महाराजांचे रिंगण पूर्ण होऊन शेवटी अश्‍वाचे रिंगण संपन्न झाले.त्यावेळी मैदानातील वातावरण माऊलीमय झाल्याचे दिसून येत होते.भाविकां मध्ये चैतन्य निर्माण झाल्यामुळे चेहऱ्यावरून समाधान ओसंडत असतानाचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर पालखी श्री महादेव मंदिर, साठे चाळ, सोलापूर येथे समारोपाला निघाली. समारोपाप्रसंगी पालखीची आरती नगरसेवक आनंद चंदनशिवे, हरिभाऊ शिंदे महाराज, प्रताप चव्हाण यांच्या शुभहस्ते होऊन समारोप करण्यात आला.
             या रिंगण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येत महिला व पुरुष भाविक उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचे नियोजन अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर कडून करण्यात आले होते सूत्रसंचालन प्रदेशाध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages