धर्म जन्माने प्राप्त झाला असला तरी त्याचा अर्थ स्वत: ला लावता आला पाहिजे : किशोर बेडकीहाळ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 30, 2020

धर्म जन्माने प्राप्त झाला असला तरी त्याचा अर्थ स्वत: ला लावता आला पाहिजे : किशोर बेडकीहाळ

धर्म जन्माने प्राप्त झाला असला तरी त्याचा अर्थ स्वत: ला लावता आला पाहिजे : किशोर बेडकीहाळ 

 शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज राज्यशास्त्र विभाग व इंग्रजी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने महात्मा गांधीजीच्या १५० व्या जयंती निमीत्त आयोजित गांधी विचारधारा प्रमाणपत्र अभ्यासक्रम समारोप व्याख्यानात ते बोलत होते. 
    शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. जयसिंह मोहिते-पाटील व महाविद्यालय विकास समीतीचे अध्यक्ष मा. संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचे प्रेरणेने व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ आबासाहेब देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या गांधी विचारधारा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विचार परीक्रमेतील गांधीजी व धर्म याविषयी विचारपुष्प गुंफताना ते बोलत होते. 
माणसाच्या कातडीला चिकटलेल्या गोचीडासारखा धर्म चिकटलेला आहे. धर्म आणि माणसाचा प्राचीन काळापासून संबध चालत आलेला आहे. धर्माची जागा ह्रदयात असली पाहिजे पण धर्म आता लोकांच्या डोक्यात गेला आहे. धर्म अस्मिता आणि अहंकाराकडे झुकला. धर्म जन्माने प्राप्त झाला असला तरी त्याचा अर्थ स्वत: ला लावता आला पाहिजे असे गांधी म्हणत.नवीन धर्म काढायचा नाही असं गांधीजीनी ठरवलं. धर्म जातीवर आधारित असल्याने सर्व समाज एकत्र येऊ शकत नाही. धर्म आहे त्या स्थितीत मी स्वीकारणार नाही. गांधीजींनी संस्थात्मक धर्म नाकारला. धर्म ग्रंथ अपूर्ण आहेत कारण ते मानव निर्मित आहेत. धर्म शुद्ध करणे म्हणजे त्यातील अनावश्यक भाग काढून टाकणे. साध्य आणि साधन सुसंगत असलं पाहिजे.हिंदू धर्मातून गांधी नी व्रताची शिकवण घेतली. अतीषय आषयप्रधान व वैचारीक मांडणी बेडकीहाळ सरांनी आज यांनी गांधीजी व धर्म मांडताना केली.
   कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ आबासाहेब देशमुख होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ विश्वनाथ आवड यांनी केले तर आभार डाॅ दत्तात्रय मगर यांनी मानले. 
    या कार्यक्रमासाठी प्रा विष्णु सुर्वे , डाॅ. अपर्णा कुचेकर, डाॅ दत्तात्रय बागडे ,, डाॅ. विशाल साळुंखे, डाॅ चंद्रशेखर ताटे देशमुख, प्रा निवृत्ती लोखंडे, मा. रविराज लव्हाळे, डाॅ अमोल शेंडगे, प्रा विनायक सुर्यवंशी, डाॅ दत्तात्रय बारबोले गांधी विचारधारा प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी उपस्थीत होते.
  कार्यक्रम यशस्वी करणेसाठी राष्ट्रीय सेवा योजना, मारूती सुर्वे, महादेव चव्हाण, संग्राम तोरसकर, समाधान वाघमोडे, सौरव गुरव , सुरज ननवरे, शामबाला क्षिरसागर, चेअरमन जाधव राज्यशास्त्र व राष्टीय सेवा योजना व सांस्कृतीक विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन कु ज्याोती भोसले हिने केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages