पेशवे लढले व शिवरायांचं नाव झालं असं हरामखोर आनंद स्वरुप म्हणाला...!
बहुजनांच्या महापुरुषांचा जाणीवपूर्वक अपमान करणाऱ्या औरंगजेबाच्या औलादींना टकमक टोकावरून फेकून द्या
मुंबई (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराजांबाबत हरामखोर आनंद स्वरुप या स्वयंघोषित बाबानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पेशवे लढले आणि शिवरायांचं नाव झालं असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हा हरामखोर एवढ्यावरच थांबला नाही तर लिंगपिसाट धीरेंद्र बागेश्वर जे म्हणाला त्याचं समर्थनही त्यांन केलं आहे.
धीरेंद्र बागेश्वर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करुन दोन दिवस उलटत नाही तोच आणखी एका स्वयंघोषित बाबानं छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आनंद स्वरुप यांनी धीरेंद्र बागेश्वर याचं समर्थन करताना शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
आनंद स्वरुप यांनी काय म्हटलं आहे?
"युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवरायांचं झालं. शिवरायांनी कधी युद्ध मैदानात लढलं नाही तर फक्त छापामार युद्ध लढले. पेशव्यांनी मात्र युद्धाच्या मैदानात लढाई केली. धीरेंद्र बागेश्वर जे बोलला त्याचं मी शब्दशः समर्थन करतो. त्यांनी माफी मागायची गरज नव्हती. पेशव्यांना यासाठी उपेक्षित ठेवलं गेलं कारण ते ब्राह्मण होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विट करायला वेळ मिळणार नाही. विश्वातले महान योद्धा, ब्राह्मण शिरोमणी बाजीराव बल्लाळ यांना पुण्यतिथीदिनी शत शत नमन," असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
हर्षवर्धन सपकाळांनी या नालायकाचा घेतला समाचार
आनंद स्वरुपांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी कठोर शब्दात समाचार घेतलाय. शिवरायांच्या शौर्याचा अपमान आनंद स्वरुप यांनी केल्याचा आरोप सपकाळांनी केला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षानंही आनंद स्वरुप याच्यावर गंभीर आरोप केला आहे. आनंद स्वरुप हा एका राजकीय पक्षाचं काम करतोय त्या पक्षाचीही तशीच भूमिका आहे का असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं उपस्थित केला आहे.
प्रवचनकारांनी समाज प्रबोधनाचं काम करणं अपेक्षित आहे. पण गेल्या काही दिवसांपासून कथित संत समाजप्रबोधन करण्याऐवजी इतिहासात लुडबूड करुन वाद निर्माण करताना दिसतायेत हे खेदानं म्हणावं लागेल.
बागेश्वरानही केलं होतं वादग्रस्त विधान
याआधी बागेश्वरान छत्रपती शिवाजी महाराजांसदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं, ज्यासाठी त्यांना माफीही मागावी लागली. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, त्यानंतर एक दिवस ते समर्थ रामदासांकडे गेले आणि म्हणाले आपण खूप युद्ध लढलो, आता हे राज्य तुम्हीच सांभाळा .पुढचे काही दिवस मला काहीच करण्याची इच्छा नाही असं विधान बागेश्वर बाबांनी केलं. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांच्या भेटीचा संदर्भ देऊन त्यांनी नागपुरात हे विधान केलं होतं.
बहुजनांच्या महापुरुषांचा जाणीवपूर्वक अपमान करणाऱ्या औरंगजेबाच्या औलादींना टकमक टोकावरून फेकून देण्याची मागणी महाराष्ट्रातील तमाम जनता करत आहे.


No comments:
Post a Comment