सोलापूरकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत जागरण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 30, 2026

सोलापूरकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत जागरण

 सोलापूरकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत जागरण




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गुन्ह्यांचे तपासकाम, सण-उत्सव, जयंती मिरवणुकांमधील बंदोबस्ताची ड्यूटी, मंत्री, व्हीआयपी लोकांच्या दौऱ्यांवेळी बंदोबस्त, अशी कामे नेहमीच पोलिसांना करावी लागतात.

दुसरीकडे, जेव्हा आपण आपल्या घरात सुरक्षितपणे झोप घेत असतो, तेव्हा आपल्या सुरक्षेसाठी पोलिस अधिकारी, अंमलदार रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शहरभर गस्त घालत असतात. सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांवर रात्रगस्तीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सोलापूर शहरात अडीच लाखांवर कुटुंब आहेत, पण शहरात १५ हजार देखील सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. आता उन्हाळ्याचा तडाखा वाढला असून, वीजपुरवठा सारखाच खंडित होत आहे. यामुळे अनेकजण घराच्या छतावर, घराबाहेरील अंगणात झोपतात. त्यावेळी चोरटे डाव साधतात, पण त्यांच्यावर पोलिस लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त विजय कबाडे, डॉ. अश्विनी पाटील, गौहर हसन यांनी रात्रगस्तीचे वेळापत्रक बनविले आहे. त्याची जबाबदारी पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपविली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages