श्री विठ्ठल कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन व ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 30, 2026

श्री विठ्ठल कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन व ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ

 श्री विठ्ठल कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन व ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ




वेणुनगर (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., वेणूनगर या कारखान्याचा सन २०२६ २०२७ हंगामातील मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम ह.भ.प. नवनाथ महाराज मोरे (मुंढेवाडी) यांचे शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत पाटील म्हणाले की, रोलर पुजन हा हंगामाचा वेग वाढविणारा पहिला कार्यक्रम असतो, मशिनरी दुरुस्तीची कामे वेळेत काळजीपूर्वक पुर्ण करुन सर्व अडचणी सोडवून कारखाना पुर्ण क्षमतेने यशस्वीपणे चालावा याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे, कारखान्याचे जास्तीत गाळप केल्यास आपल्याला कोणत्याही अडचणी येणार नाहीत. विठ्ठल कारखान्यामुळेच दराची स्पर्धा निर्माण होवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर मिळत आहे. त्यामुळे येत्या गळीत हंगामामध्ये आपण पिकविलेला संपुर्ण ऊस आपल्या कारखान्यास गळीतास पाठवावा. संचालक मंडळ, सभासद, कामगार व तोडणी वाहतूक ठेकेदार ही चार चाके असून सर्वांनी एकत्रीत येवून हा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडावा. गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गळीतास आलेल्या व श्री विठ्ठल कारखान्यामार्फत इतर कारखान्यास गळीतास गेलेल्या ऊसास रु.३००१ प्रमाणे ऊस पुरवठादार शेतकरी यांना रु.३१९ कोटीची सर्व बिले अदा केलेली आहेत, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार यांची तोडणी वाहतूक बिले अदा केलेले आहेत. साखरेच्या किमान विक्री मुल्य व एफ.आर.पी. यामध्ये तफावत असल्याने कारखान्यांना ऊसबिले अदा करताना अडचणींना सामोरे जावे लागते. पंजाब व इतर राज्यांनी एफ.आर.पी. अदा करणेसाठी रु.५०० अनुदान दिलेले आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनानेही प्र.मे.टन रु.६०० प्रमाणे अनुदान द्यावे अशी मागणी केलेली आहे. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचे फायनल पेमेंट ठरल्याप्रमाणे अदा केलेले आहे. ठरल्याप्रमाणे मागील थकीत पगार व इतर देणी देणेचे वाटप चालू केलेले आहे. सध्या कामावर असलेल्या कामगारांची ठरल्याप्रमाणे मागील थकीत पगार व इतर देणी लवकरच टप्या टप्याने रक्कम अदा करणेस संचालक मंडळ कटीबध्द आहे तसेच गळीत हंगाम २०२६-२०२७ साठी ऊस तोडणी वाहतूक कराराच्या अर्जाचे विधीवत पुजन शेती कमिटीचे चेअरमन श्री दत्तात्रय नरसाळे व इतर मान्यवरांचे शुभहस्ते करून ऊस तोडणी व वाहतूक कराराचा आजपासून शुभारंभ करणेत आला. याप्रसंगी ह.भ.प. नवनाथ महाराज मोरे हे आपल्या अध्यात्मिक शैलीमध्ये विचार व्यक्त करताना म्हणाले की, श्री विठ्ठल कारखान्यामागे फार मोठी आध्यात्मिक शक्ती आहे. विठ्ठलचा सभासद शेतकरी व कामगार हा राजा आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करुन हा राजवाडा टिकला पाहिजे अशी दुरदृष्टी असणारे कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत पाटील हे जनतेचे प्रश्न सोडविणेसाठी सतत प्रयत्नशिल असून त्यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना निश्चित प्रगतीपथावर राहील, असे ते म्हणाले व पुढील गळीत हंगाम यशस्वी होणेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे संचालक मस्के यांनी केले व इतर मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन नितीन पवार ऊस पुरवठा अधिकारी यांनी केले. सदर प्रसंगी कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, संचालक सर्वश्री कालिदास साळुंखे, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, नवनाथ नाईकनवरे, सचिन वाघाटे, सिध्देश्वर बंडगर, तायाप्पा गवळी, महेश खटके, विठ्ठलनाना रणदिवे तज्ञ संचालक दशरथ जाधव, अशोक तोंडले, निमंत्रीत संचालक श्री अंगद चिखलकर, धनाजी खरात, गणेश ननवरे, कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य व इतर मान्यवर, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, सभासद, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages