दौंड–कलबुर्गी शटलला कायमस्वरूपी मान्यता; प्रवासी सेवा संघाचा पाठपुरावा यशस्वी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 30, 2026

दौंड–कलबुर्गी शटलला कायमस्वरूपी मान्यता; प्रवासी सेवा संघाचा पाठपुरावा यशस्वी

 दौंड–कलबुर्गी शटलला कायमस्वरूपी मान्यता; प्रवासी सेवा संघाचा पाठपुरावा यशस्वी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रवासी सेवा संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, दौंड–कलबुर्गी–दौंड या विशेष शटल रेल्वे सेवेला कायमस्वरूपी मान्यता मिळाली आहे. रेल्वे बोर्ड, रेल्वे मंत्रालय (नवी दिल्ली) यांच्याकडून या गाडीला नियमित सेवेसाठी मंजुरी देण्यात आली आहे.

दि. १ एप्रिल २०२५ पासून ही गाडी विशेष सेवा म्हणून सुरू होती. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आणि या मार्गावरील गरज लक्षात घेऊन प्रवासी सेवा संघाने वेळोवेळी मुदतवाढीसाठी पाठपुरावा केला. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 01421 / 01422 आणि 01425 / 01426 या क्रमांकाच्या गाड्यांना आता कायमस्वरूपी स्वरूप प्राप्त झाले आहे.

या निर्णयामुळे दौंड, सोलापूर, कलबुर्गी या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवास अधिक सोयीस्कर आणि नियमित होणार आहे.

प्रवासी सेवा संघ सोलापूरच्या वतीने सर्व सहकार्य करणाऱ्या नागरिक, पदाधिकारी आणि रेल्वे प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहेत. संघटनेने ही यशस्वी लढत सर्वांच्या एकजुटीचा परिणाम असल्याचे सांगितले आहे.

“सर्वांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि सहकार्यामुळे ही सेवा कायमस्वरूपी झाली,” अशी भावना संघटनेने व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages