रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची मंगळवारी जाहीर सभा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 30, 2026

रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची मंगळवारी जाहीर सभा

 रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची मंगळवारी जाहीर सभा 



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे मंगळवार दि. 5 मे 2026 रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा तसेच जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा प्रभारी सिद्धार्थ कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
         यानिमित्ताने आनंदराज आंबेडकर यांची सोलापुरातील जुना देगाव नाका येथील बी. आर. क्रीडा युवक मंडळाच्या प्रांगणामध्ये मंगळवारी 5 मे रोजी सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या दौऱ्यात ते रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि समस्या जाणून घेणार आहेत. या सभेचे आयोजन बी. आर. क्रीडा मंडळाचे व्यवस्थापक दीपक आव्हाड आणि रिपब्लिकन सेना  जिल्हा प्रभारी सिद्धार्थ कांबळे यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिद्धार्थ कांबळे यांनी केले आहे.
         या पत्रकार परिषदेस सुबोध सोनकांबळे, बाळासाहेब दुपारगुडे, भीमराय बिराजदार, नागेश भालेराव आदी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages