शिवरत्न नॉलेज सिटी येथे भव्य रक्तदान शिबीर १२१ रक्तदात्यांनी बजावला रक्तदानाचा हक्क
अकलूज (प्रतिनिधी)दि २९ शिवरत्न शिक्षण संस्था आयोजित सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या 102 व्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 121 रक्तदात्यांनी आपला रक्तदानाचा हक्क बजावला. या शिबीराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील व उपाध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील यांचे हस्ते झाले. यावेळी सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील ब्लॅड बँकेचे वतीने डॉ. संतोष दोशी, डॉ. संतोष खडतरे, डॉ. अजित गांधी, डॉ. राजेंश चंकेश्वरा उपस्थित होते. तसेच ब्लड बँकेचा सर्व स्टाफ, शिवरत्न संस्थेचे सेक्रेटरी शिंदे सर व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी १२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. आधी केले मग सांगितले… या उक्तीप्रमाणे या रक्तदान शिबीराचे उद्घाटन झाल्यावर स्वतः धैर्यशील मोहिते-पाटील व शितलदेवी मोहिते-पाटील या उभयंतांनी रक्तदान करुन या शिबीराची सुरुवात केली.

0 Comments