शिक्षकांनी स्वतः निर्व्यसनी राहून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवावा - गटशिक्षणाधिकारी मारूती फडके - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, January 11, 2020

शिक्षकांनी स्वतः निर्व्यसनी राहून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवावा - गटशिक्षणाधिकारी मारूती फडके

शिक्षकांनी स्वतः निर्व्यसनी राहून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवावा - गटशिक्षणाधिकारी मारूती फडके   
कुर्डुवाडी प्रतिनिधी- माढा तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि आश्रमशाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी स्वतः कायमस्वरूपी निर्व्यसनी राहून कृतीयुक्त चांगला आदर्श ठेवावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी मारूती फडके यांनी केले आहे. ते कापसेवाडी ता.माढा येथे  शासनाच्या व सलाम बाॅम्बे फाऊंडेशनच्या तंबाखूमुक्त शाळा अभियानांतर्गत तालुक्यातील पहिले माध्यमिक विद्यालय म्हणून श्री संत गाडगेबाबा विद्यालयास प्रमाणपत्र देण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी 10 जानेवारी रोजी बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना   मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण यांनी प्रशालेतील विविध उपक्रम व शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. 
याप्रसंगी कुर्डूवाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी मारूती फडके यांनी तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न शाळा अभियानाचे सर्व 11 निकष पूर्ण केल्याबद्दल   मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण व शिक्षकांना प्रमाणपत्र सुपूर्त करून कौतुक केले. 
पुढे बोलताना फडके म्हणाले की,आजच्या धकाधकीच्या युगात चांगले आरोग्य जपणे आवश्यक परंतु दुर्दैवाने अनेकजण वाईट व्यसनाच्या आहारी जात आहेत त्यामुळे अकाली मृत्यूंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे हे खूपच भयंकर आहे. प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळा तंबाखूमुक्त करून समाज व्यसनमुक्त बनविण्यासाठी हे अभियान एक चळवळ निर्माण व्हावी.याकरिता विद्यार्थ्यी- शिक्षकांनी प्रयत्न करावेत.अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल खोत यांनी केले.आभार तुकाराम कापसे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे विषयतज्ञ महादेव सोनवणे,बापू चवरे,प्रवीणकुमार लटके,तनुजा तांबोळी,शिवाजी भोगे,सचिन शिरसागर,सुधीर टोणगे,लहू गवळी,सागर राजगुरू यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages