डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक,कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर व्हावे.रेल्वे महाप्रबंधकांना निवेदन. 
कुर्डुवाडी प्रतिनिधी- मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संदिप मित्तल, यांनी आज कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनला भेट दिली.यावेळी विविध मागण्यासंदर्भात,रेल्वे सल्लागार समिती तसेच प्रा. डॉ .अशिष रजपुत यांनी त्यांना निवेदन दिले.कुर्डुवाडी स्टेशला सर्व गाड्यांना थांबा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.तसेच कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेल्या घटनेला ७५ वर्षांपेक्षा जास्त कालखंड झाला आहे.त्यामुळे या ऐतिहासिक क्षणाचे कायम स्वरूपी स्मारक कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनवर उभारण्यात यावे.असे निवेदन प्रा.डाॅ आशिष रजपूत यांच्या वतीने देण्यात आले. तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्रमय चरित्राचे पुस्तक महाप्रबंधक मित्तल यांना भेट देण्यात आले.या पुस्तकात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा कुर्डूवाडी रेल्वेस्टेशन वरील फोटोचाही समावेश आहे. या सर्व मागण्यांसाठी मध्यरेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या सर्व मागण्या रेल्वे बोर्डाला कळवून लवकरच सोडवण्याचा प्रयत्न करु तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बनवण्यासाठी प्रयत्न करु. अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.या वेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य-श्रीनिवास बागडे,अमोल कुलकर्णी,नासिर बागवान,संतोष शेंडे,भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुधिर गाडेकर उपस्थित होते.

0 Comments