माऊली संगीत संगीत भजनी मंडळाच्या वतीने सांगोला संगीत महोत्सवाचे आयोजन. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 10, 2020

माऊली संगीत संगीत भजनी मंडळाच्या वतीने सांगोला संगीत महोत्सवाचे आयोजन.

माऊली संगीत संगीत भजनी मंडळाच्या वतीने सांगोला संगीत महोत्सवाचे आयोजन.


 

सांगोला (जगन्नाथ साठे) माऊली संगीत विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सांगोला येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय, गणेश मंदिर महुद रोड, सांगोला येथे उद्या शनिवार दिनांक 11 जानेवारी 2020 रोजी दुपारी १२ ;३० ते ६;३० यावेळेत सांगोला संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संगीत विशारद दयानंद बनकर यांनी दिली.
                 या संगीत महोत्सवात ह. भ .प .बाळासाहेब कुंभार गुरुजी, पंडित . शामरावजी सुतार, कोल्हापूर यांचे संगीत प्रेमींना अनमोल मार्गदर्शन लाभणार असून या वेळी विद्यार्थ्यांचे सादरीकरण होणार आहे. विद्यार्थ्यांचे सादरीकरण दुपारी साडेबारा ते 3 या वेळेत होणार आहे ,तर दुपारी साडेतीन ते साडेसहा या वेळेत संगीत मैफिल रंगणार आहे.या  संगीत मैफिल मध्ये  अतुल ताडे कोल्हापूर यांचे तबलावादन, मृदंग अलंकार  अरुण शिंदे यांचे मृदंग वादन, गजानन सुतार यांचे हार्मोनियम,सोपान पारसे यांचे शहनाई वादन, संगीत विशारद संदीप गोंधळी यांचे गायन, तसेच संगीत विशारद महेश बेले यांचे गायन हा कार्यक्रम होणार आहे.हा संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य असणार आह. तरी या कार्यक्रमास सांगोला शहर आणि तालुक्यातील संगीत प्रेमींनी आवर्जून उपस्थित रहावे,असे आवाहन माऊली संगीत भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले  आहे. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी दयानंद बनकर-७२१९१७११५६, राजेंद्र सूर्यवंशी--९४२३५६०९४५, अतुल उकळे--९८८१५१७०९३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन माऊली संगीत भजनी मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages