जीवण आधार फौंडेशनच्यावतीने मिटकलवाडी येथे स्पोर्ट ड्रेसचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 5, 2019

जीवण आधार फौंडेशनच्यावतीने मिटकलवाडी येथे स्पोर्ट ड्रेसचे वाटप

जीवण आधार फौंडेशनच्यावतीने मिटकलवाडी येथे स्पोर्ट ड्रेसचे वाटप
टेंभुर्णी (प्रतिनिधी ) - टेंभुर्णी पासुन सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मिटकलवाडी येथे जीवन आधार फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष किशोर बापू सलगर यांनी जी.प. प्राथमिक शाळा मिटकलवाडी ता.माढा. येथील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस चे मोफत वाटप केले.  इंग्लिश स्कूल मध्ये शिकणाऱ्या मुलांना ज्या सुख सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा जि. प प्राथमिक शाळेतल्या मुलांना भेटाव्या म्हणून जीवन आधार फौंडेशन यांनी सर्व विद्यार्थ्यांना(110) स्पोर्ट ड्रेस वाटप केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जीवन आधार फौंडेशन चे चेअरमन किशोर बापू सलगर , सोसायटी चेअरमन भारत भाऊ मिटकल शाळा  समिती अध्यक्ष हनुमंत मिटकल , जि. प प्राथमिक शाळा मुख्याध्यापक कोरे सर,पालक दादासो ठेंगल , माजी सरपंच मोहन ठेंगल व सर्व सहकारी शिक्षक स्टाफ उपस्तिथी होते.
तसेच दर वर्षी वेगवेगळे कार्यक्रम कन्यारत्न पुरस्कार, अहिल्यारत्न ठेव योजना,रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन  किशोर बापू सलगर जीवन आधार फौंडेशन च्या माध्यमातून नेहमीच करत असतात. त्यांच्या सामाजिक कामाबद्दल ग्रामस्थां मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages