लायन्स क्लबच्या रन फॉर युनिटी अण्ड हेल्थ या स्पर्धेत बार्शीकरांचा उत्स्फूर्त सहभाग ;कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक डॉ. सुहास वारके यांच्या उपस्थित कार्यक्रम
बार्शी प्रतिनिधी - उत्तम आरोग्याचा संदेश देत बार्शीत लायन्स क्लबने आयोजित केलेल्या रन फॉर युनिटी, रन फॉर हेल्थ अर्थातच मॅरेथॉन स्पर्धेला बार्शीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी सहा वाजल्यापासून एक उत्साहाचा माहोल तयार झाला होता. नगरपालिकेच्या सहकार्याने बार्शी पोलिसांनी यासाठी अत्यंत चोख व्यवस्था केली होती. बार्शी लायन्स क्लब रॉयलनेही यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक डॉ. सुहास वारके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम घेण्यात आला. सोलापूर जिल्हा शहर व ग्रामीण पोलिस, निर्भया पथक तसेच लायन्स क्लब रॉयल यांच्यावतीने संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमास श्री. गणेश वस्त्रदालनचे महेश यादव यांनी मोलाचे सहकार्य केले.
सकाळी साडे सहा वाजता श्री. शिवाजी कॉलेज समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे, पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, तालुका पोलिस ठाण्याचे राहूल देशपांडे तसेच नगराध्यक्ष अॅड. असिफ तांबोळी, लायन्सचे प्रांतपाल जितेंद्र दोशी, नगरसेवक विजय राऊत, प्रशांत कथले, बापू कदम, लायन्सचे संतोष गुळमिरे, डॉ. जितेंद्र माढेकर, शितल गांधी, लायन्स रॉयलचे प्रकल्प प्रमुख महावीर शहा, अजित कुंकूलोळ, सचिन मडके आदी उपस्थित होेते.
बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाने प्रत्येक शाळांत जाऊन मुला, मुलींना या मॅरेथॉनमधील सहभागासाठी आवाहन केले होते. लायन्स क्लबचे जितेंद्र माढेकर, महावीर शहा, संतोष गुळमिरे, अमित कांकरिया, डॉ. निनाद दोशी माढेकर यांच्यासह कल्बच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या मॅरेथॉन स्पर्धेत मुलींमध्ये प्रियंका दरगुडे (प्रथम क्रमांक), वैष्णवी खरचे (द्वितीय क्रमांक) तर मिताली जाधव (तृतीय क्रमांक) यांचा गौरव करण्यात आला. मुलांमध्ये रोहीत बचुटे (प्रथम क्रमांक), वाल्मिक जाधव (द्वितीय क्रमांक) तर आनंद सातपुते (तृतीय क्रमांक) या सर्व विजेत्यांना विशेष पोलिस महासंचालक डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

No comments:
Post a Comment