टेंभुर्णी अपघात एक ठार
टेंभुर्णी (प्रतिनिधी )
ऊस वाहतूक करणाऱ्या रिकाम्या वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने येथील प्रसिद्ध मंडप व्यवसायिक प्रकाश सुभाष कोळपे वय ४२ रा. कोळपे वस्ती टेंभुर्णी ता. माढा यांचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी ६. ३० वाजण्याचा सुमारास घडली.
येथील मंडप व्यवसायिक प्रकाश कोळपे हे कोळपे वस्ती येथील घरून टेंभुर्णी येथे किराणा सामान आणण्याकरिता निघाले होते. येथील टेंभुर्णी करमाळा रोडवर टेंभुर्णी जवळ आले असता. अकोले येथे निघालेल्या आज्ञात वाहनाने समोरून जोरदार दिली. यामध्ये कोळपे यांच्या अंगावरून ट्रॕक्टर चाके गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना अकलूज येथे उपचाराकरिता नेले जात असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत चालू होते.


No comments:
Post a Comment