लोकमंगल महाविद्यालयाची शैक्षणिक सहल
मोहोळ प्रतिनिधी - महात्मा फुले क्रुषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत व श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल क्रुषि व्यवसाय व व्यवस्थापन (Agriculture Business Managment) महाविद्यालयातील प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांनी मोहोळ जवळील नालबंदवाडी येथील संतोष थिटे यांच्या पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय प्रकल्पास भेट दिली.पशुसं वर्धन व दुग्धशास्त्र या विषया अंतर्गत विद्यार्थ्यांना यावेळी माहिती देण्यात आली. जनावरांचे संवर्धन कसे करावे व त्यांची काळजी कशी घ्यावी यांचे योग्य मार्गदर्शन श्री.संतोष थिटे यांनी प्रत्यक्षपणे दिली. तसेच त्यांच्या यूनिट मधील 76 गायीचे व 20 वासरांचे नियोजन कसे केले जाते तसेच दूधापासून खवा तयार करण्याची मशीन यांची विस्तृत पणे माहिती दिली ............या वेळी महाविद्यालयातील प्रा.ज्योती गायकवाड, प्रा. प्रवीण शेळके आदी उपस्थित होते या सहलीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रणजित पाटील यांच्यासह आदींनी सहकार्य केले.

No comments:
Post a Comment