शरद पवारसाहेबांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान ; जयमालाताई गायकवाड कडलास हायस्कुल कडलास येथे शरद पवार यांचा वाढदिवस साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 12, 2019

शरद पवारसाहेबांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान ; जयमालाताई गायकवाड कडलास हायस्कुल कडलास येथे शरद पवार यांचा वाढदिवस साजरा

शरद पवारसाहेबांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान ;
 जयमालाताई गायकवाड कडलास हायस्कुल कडलास येथे शरद पवार यांचा वाढदिवस साजरा




सांगोला( मोहन शिंदे)  शरद पवार साहेब यांचे कार्य महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वाचे असूूून  त्यानी केेेवळ शेतकऱ्यासाठीच नाही तर सामाजिक,राजकीय ,शैक्षणिक आणि महिलांसाठी सुद्धा त्यांनी केलेेेले कार्य अतुलनीय असून महाराष्ट्राला विकासाच्या वेगळ्या उंचीवर पोहचविण्याचे कार्य पवार साहेब यांनी केले असून त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना शुभेच्छा देतो,त्यांना दीर्घायुष्य मिळावं, ही सदिच्छा या वाढदिनी व्यक्त करतो, असे मत  जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांनी कडलास हायस्कुल कडलास येथे व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर,सरपंच गजानन ननवरे, माजी उपसरपंच सुनिल पाटील,उपसरपंच आण्णासाहेब गायकवाड,शाळेचे मुख्याध्यापक शहाजीराव गायकवाड पाटील,बंडू लवटे, सुनिल ठोकळे,शिवाजी ठोकळे,ग्रामसेवक यु.डी.भोसले,शाळेतील शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

      यावेळी पुढे बोलताना  जयमालाताई गायकवाड म्हणाल्या की, लोकांना सामाजिक विकास करावयाचा असेल तर राजकारणातून होत असतो,तो विकास पवार साहेब यांनी देशाला दाखविला आहे. विविध क्षेत्रात त्यांनी देशाला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले असल्याचे मत व्यक्त करून शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप केले. यावेळी माजी उपसरपंच सुनिल(काका)पाटील म्हणाले की,शेतकऱ्यांचा जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला जात आहे. आज त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श राजकारणात येऊ पाहणारी पिढी घेऊ पाहत आहे. नेहमीच पवार साहेबांनी विकासाभिमुख राजकारण केले आहे.त्यांना दीर्घायुष्य लाभो,ही सदिच्छा व्यक्त केली.

 तत्पूर्वी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत सौ.राणीताई लवटे मॅडम यांनी केले.तर सुत्रसंचालन नागनाथ दुधाळ सर, यांनी केले तर आभार आण्णासाहेब गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक,शिक्षिका पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages