सोलापूर विद्यापीठ क्रीडाज्योतीचे अकलूज येथे जल्लोषात स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 21, 2019

सोलापूर विद्यापीठ क्रीडाज्योतीचे अकलूज येथे जल्लोषात स्वागत

सोलापूर विद्यापीठ क्रीडाज्योतीचे अकलूज येथे जल्लोषात स्वागत


                 [अकलूज/प्रतिनिधी ] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ क्रीडाज्योतीचे शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज येथे जल्लोषात स्वागत करण्‍यात आले.दि.२६ ते ३० डिंसेबर या कालावधीत संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेबाबत जनजागृती करणे व विदयार्थ्यामध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने क्रीडा ज्योतीचे आयोजन विद्यापिठाचे वतीने करणेत आलेले आहे. शंकरराव मोहिते महाविद्यालय याठिकाणी मुक्कामी असलेल्या सर्व टिम सदस्याचे जल्लोषात स्वागत करणेत आले. 
                               या कार्यक्रम प्रसंगी विद्यापीठ वित्त विभागाचे सहाय्यक कुलसचीव प्रा.शिवाजीराव शिंदे, सिनेट सदस्य प्रा.सचिन गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख, विद्यापीठ ज्योत समीती सदस्य डॉ.विश्वनाथ आवड, फिजीकल डायरेक्टर प्रा.अरविंद वाघमोडे, प्रा.दादासाहेब कोकाटे, प्रा.भोसले, डॉ.बाळासाहेब मुळीक, प्रा.गोरख माने, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक युवराज मालुसरे, राष्ट्रीय कब्बडी खेळाडू योगेश शेंडगे यांचेसह क्रीडा विभागातील सर्व खेळाडू व महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नागन्नाथ साळवे यांनी केले तर आभार प्रा.दादासाहेब कोकाटे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages