बाल दुर्रव्यापार भारत मुक्त अभियानाची जतमध्ये सुरवात ; कैलास सत्यार्थी फाऊंडेशन नवी दिल्ली यांचा उपक्रम
वळसंग : प्रतिनिधी - कैलास सत्यार्थी फाऊंडेशन नवी दिल्ली व सरस्वती सेवाभावी संस्था बीड यांच्या पुरस्कृत उत्कर्ष शिक्षण व सेवाभावी संस्था सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने "बाल दुर्रव्यापार मुक्त भारत" अभियान अंतर्गत जत येथील एस.आर.व्ही. एम. येथे जनसंवाद सोहळा घेण्यात आला. सदर अभियानातर्फे देशभरातील बाल कामगार, शाळा बाह्यमुले, बाल तस्करी, लैंगिक शोषण या विषयावर जागरूकतेचे कार्य ही संस्था करते. महाराष्ट्र भर विविध अधिकारी, पत्रकार, सुजाण नागरिक यांच्या जनसंवाद अभियान अंतर्गत बाल संबंधी असणारे अनिष्ठ प्रथा सोबत शोषण पूर्णतः बंद करून त्यावर कार्य करण्याचे उत्तम कार्य ह्या संस्था करतात या अनुषंगाने जिल्हा समन्वयक शाम पवार व सोबत सहकारी पदाधिकारी यांच्या संयोजनाने जत येथे जनसंवाद आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समिती सभापती सुशीला तावशी व प्रमुख पाहुणे म्हणून जत पोलीस निरीक्षक शेळके साहेब हे लाभले होते. अनुक्रमे विविध संस्थाचालक व प्रतिनिधी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते तसेच महात्मा फुले सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंझाडे, एकात्मिक बाल विकास विभाग अधिकारी सौ. कांबळे मॅडम, एस.आर.व्ही.एम. कॉलेज प्राचार्य काटकर सर, सातारा विभाग प्रमुख गोरे सर, सहाय्यक कामगार अधिकारी सोनार सर तर प्रतिनिधी पतंगे सर आदी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे जिल्हा समन्वयक पवार सर यांनी प्रस्तावना मांडले यात संस्थेचे कार्य व आधुनिक जगाच्या पाठीवर असणाऱ्या बाल आणि महिला यांच्या समस्या व निराकरण यावर मार्गदर्शन केले. प्रथम पुष्प म्हणून पोलीस निरीक्षक शेळके साहेब मार्गदर्शन करताना महिला व मुलीशी संवाद साधला आणि यात मुलींचे ध्येय आणि आई वडिलांचे स्वप्न यावर गांभीर्याने विचार करत आपले जीवन जगले पाहिजे तर आजच्या आकर्षण आणि अत्याचाराच्या घटनेला डोळ्यासमोर ठेऊन सावध राहत शिक्षण आणि ध्येय पूर्णत्वास नेण्यासाठी महत्वाच्या सूचना केल्या यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनुक्रमे झिझाडे व उपस्थित महिला अधिकारी व प्रतिनिधी यांनी आपले मत मांडले. मुनीर सुल्ताने, सदाशिव पांडव, बाल कामगार अधिकारी कांबळे सर व आदी उपस्थित राहून संयोजनाचे काम पाहिले तर उपस्थित प्रतिनिधी व अधिकारी यांचे सत्कार जयश्री पवार यांनी केले व आभार प्रदर्शन अमोल यादव व सूत्रसंचालन प्रा. शरद सर यांनी केले.

No comments:
Post a Comment