ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांचा श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने जाहीर सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 21, 2019

ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांचा श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने जाहीर सत्कार

 ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांचा श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने जाहीर सत्कार
 सोलापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सोलापूरचे ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांची निवड झाल्याबद्दल तसेच त्यांचा वाढदिवस असल्याबद्दल श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने त्यांचा मंगळवारी सायंकाळी जाहीर सत्कार करण्यात आला .सोलापूरच्या राजेश कोठे नगरातील श्री संत मुक्ताई  मंदिरात  मंगळवारी सायंकाळी हा सत्काराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी वारकरी फडकरी संघटनेचे उपाध्यक्ष ह.भ.प.भागवत महाराज चवरे ,ह.भ.प.लक्ष्मण महाराज चव्हाण, शंकरानंद स्वामी, नगरसेवक शिवानंद पाटील ,लोकमंगल बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख, लहू गायकवाड, शिवराम प्रतिष्ठानचे बापू वाडेकर ,उमेश मराठे,ज्योतीराम चांगभले,बळीराम जांभळे,संजय पवार,तानाजी बेलेराव,संजय केसरे,मधुकर इंगळे,मोहन शेळके,किशोर धायगुडे,बसू जाधव आदी उपस्थित होते.  वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बरडे, BR न्युजचे संपादक मनीष केत,नगरसेवक देवेंद्र कोठे कोठे, माऊली पवार,विनोद भोसले,शेखर फंड,ज्ञानेश्वर सपाटे,येस न्युज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे,आबा शेंडगे, यांनी देखील इंगळे महाराज यांचा सत्कार केला.. यावेळी ह.भ.प.लक्ष्मण महाराज चव्हाण बोलताना म्हणाले कि सुधाकर महाराजांचे वय वाढलेले असेल म्हणून तो वाढदिवस नाही तर त्यांचे काम वाढले आहे म्हणून वाढदिवस आहे..उमेश मराठे यांनी इंगळे महाराज यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हणले इंगळे महाराज हे भक्तीचे भुकेले आहेत असे म्हणाले.तसेच ह.भ.प.भागवत महाराज चवरे यांनी  ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांना शुभेच्छा दिल्या.
                    सत्काराला उत्तर  देताना ह भ प सुधाकर इंगळे महाराज म्हणाले की मी आजवर कधीही वाढदिवस साजरा केला नाही पंढरपूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रमासाठी नियोजन करावे, निधी संकलन करावा या साठीच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे नेत्रदीपक असा सोहळा पंढरपूरात पार पाडावयाच्या आहे असेही ते म्हणाले,
  कार्यक्रमाचे आभार भाऊसाहेब बेलेराव यांनी केले.या कार्यक्रमासाठी आदर्श इंगळे,ऋषिकेश झांबरे,कृष्णा चवरे,अक्षय इंगळे,अनिकेत जांभळे,महेश चवरे,सचिन भोसले गुरु गायकवाड,शिवानंद जाधव,तसेच श्री संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विध्यार्थानी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages