जागतिक एड्स दिन विविध उपक्रमांनी साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 10, 2019

जागतिक एड्स दिन विविध उपक्रमांनी साजरा







जागतिक एड्स दिन विविध उपक्रमांनी साजरा

        पंढरपूर दि.10:‍- जागतिक एड्स  दिनाचे औचित्य साधून पंधरवडा निमित्त उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्या वतीने  एड्स बाबत जनजागृती रॅली, मोफत रक्त तपासणी, एच.आय.व्ही संक्रमितांचा वधुवर मेळावा अशा  विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
        जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर रॅलीचे आयेजन टिळक स्मारक मैदान, पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्कीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, प्र. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, आगार प्रमुख एस.एस. बिराजदार, डॉ. सयाजीराव गायकवाड, डॉ. प्रसन्न भातलवंडे, डॉ. अविनाश उईके, डॉ. माशाळ,  डॉ. अनिता कार्येकर्ते, डॉ. आशा घोडके. यांच्यासह पालवी संस्थेचे तसेच विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
         या वर्षीचे घोषवाक्य ‘समाज बदल घडवू शकतो’ हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी वैयक्तिक व सामाजिक तसेच  शासकीय पातळीवर  जबाबदारी घेवून जागरुकता निर्माण करण्यासाठी  राज्य एड्स नियत्रंण संस्थेच प्रकल्प संचालक तुकाराम मुंढे यांच्या सुचनेनुसार जागतिक एड्स दिन व पंधरवडा साजरा करण्याचे नियोजन उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने करण्यात आले असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षका डॉ. जयश्री ढवळे यांनी यावेळी सांगितले. तसेच उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित एच.आय.व्ही संक्रमितांचा वधुवर मेळाव्यात विवाहइच्छुक 50 जणांनी आपला परिचय करुन दिला. त्यापैकी मेळाव्यात  दोन  विवाह जुळले असल्याचेही डॉ. ढवळे यांनी सांगितले.
        एड्सविषयी समज गैरसमज याची माहिती सांगून रुग्णांना माणुसकीची वागणूक देण्याची गरज असल्याचे डॉ.एकनाथ बोधले यांनी यावेळी सांगितले. एचआयव्ही नवीन लागण, एड्स संबंधित आजार आणि रुग्णांशी होणारा भेदभाव शून्यावर आणणे आवश्यक असल्याचे डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी सांगितले.
       एड्स दिनानिमित्त  प्रारंभी उपस्थितांना शपथ देण्यात आली. त्यानंतर शहरातून रॅली काढण्यात आली. ही रॅली टिळक स्मारक मैदान येथून निघून शिवाजी चौक, चौफाळा, गांधी रोड, नाथ चौक, भजनदास चौक, गोविंदपुरा मार्गे काढण्यात आली व उप जिल्हा रुग्णालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी रॅलीत शहरातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालवी संस्थेचे मुले, सामाजिक संस्था तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन पुरषोत्तम कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन  बाजीराव नामदे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages