राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने कर्तृत्ववान महिलांना शारदाई पुरस्कार जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 10, 2019

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने कर्तृत्ववान महिलांना शारदाई पुरस्कार जाहीर






राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने कर्तृत्ववान महिलांना शारदाई पुरस्कार जाहीर.
पंढरपूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांनी अनंत अडचणींना तोंड देत आपला परिवार व शरदचंद्रजी पवार साहेबांसारखा नेता घडविला अशा शारदाई सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक आहेत त्यातील 11 कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस यांच्यावतीने कर्तृतत्वान महिला यांना शारदाई पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. त्याचा कार्यक्रम दि.25 डिसेंबर 2019 रोजी श्री संत तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे संध्याकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, आमदार सुमनताई पाटील, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, आमदार भारतनाना भालके, मा.आ.राजन पाटील, आमदार यशवंत माने , आमदार बबनदादा शिंदे, वैशालीताई गुंड यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संयोजक श्रीकांत शिंदे, शहराध्यक्ष संदीप मांडवे, जिल्हा युवक सचिव सुरज पेंडाल यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या कर्तृतत्वान महिला 1) अनुसयाबाई ज्ञानोबा माने (बार्शी), 2) सौ.सुनंदा शरदराव पाटील (माढा) 3) नर्मदा नारायण माने (पंढरपूर) 4)सौ.सुमन मुरलीधर वाघमारे (सोलापूर) 5) श्रीमती दुल्हन बबन साठे (माळशिरस) 6) श्रीमती जयश्री धनंजयराव पाटील (पंढरपूर) 7) सौ.सुनंदा शिवाजी बागल (पंढरपूर) 8) श्रीमती रूक्मिणी शंकरराव खताळ (खताळ) 9) कमल ज्ञानेश्वर भोसले (मंगळवेढा) 10) जोहरा शफेरद्दीन काझी (करमाळा) 11) श्रीमती यशोदा निवृत्ती गाजरे (सांगोला) यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages